लाइव्ह

Maharashtra Breaking News Live: ‘त्याच्या नादी कोण लागणार’, जरांगेंना उद्देशून भूजबळ काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

manoj jarange patil
manoj jarange patil
social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

  • 09:54 PM • 16 Dec 2023

    Maharashtra Breaking News Live: , जरांगेना उद्देशून भूजबळ काय म्हणाले?

    कुणाच्या नादी लागू नका त्याच्या( जरांगे)च्या नादी कोण लागणार.. आम्ही आम्ही जे आहे ओबीसीच्यावर कोणाला आक्रमण करू देणार नाही.. त्यासाठी आमचा लढा आहे मराठा समाजाला आरक्षण आमचा विरोध नाही... पण त्यांना ओबीसीतूनच पाहिजे हा जो काय त्याचा लाड चालले आहे.. ते कळत नाही. या राज्यामध्ये 54% ओबीसी आहे. बाकी सगळे मागासवर्गीय सगळ्यांनी लक्षात ठेवावं अशा रीतीने कुठल्याही लहान समाजावर अन्याय होणार असतील महाराष्ट्रातील विचारवंत मराठा सुद्धा विरोध करतील, असे छगन भूजबळ म्हणाले आहेत.
  • 08:32 PM • 16 Dec 2023

    Maharshtra Breaking News Live : 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर विचार करा, महाजनांच्या मागणीवर जरांगे काय म्हणाले?

    मराठा आरक्षणासाठी सर्व यंत्रणा आम्ही कामाला लावली आहे. सरकार कुठेही कमी पडणार नाही. 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर विचार करा, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. यावर बोलताना, उद्या बैठक होणार आहे त्यावेळी अल्टिमेटमवर विचार करू, असं जरांगे पाटील म्हणाले.
  • 07:53 PM • 16 Dec 2023

    Maharshtra Breaking News Live : सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीला, मराठा आरक्षणावर चर्चा सुरू

    मराठा आंदोलक जरांगे पाटील यांचे सध्या रूग्णालयात उपचार सूरू आहेत. या दरम्यान सरकारचं शिष्टमंडळ जरांगेच्या भेटीला गेले आहेत. या भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा सुरु आहे.
  • 05:30 PM • 16 Dec 2023

    Maharshtra Breaking News Live: धारावी मोर्चात उद्धव ठाकरे संतापले, फडणवीसांना सुनावलं

    50 खोके कमी पडले म्हणून धारावी, मुंबई गिळतायत, ठाकरेंची CM शिंदेंवर टीका.. सरकार आपल्या नव्हे तर अदानींच्या दारी, ठाकरेंचा महायुतीला टोला.. तुम्ही अदानींचे बूट कशासाठी चाटताय, ठाकरेंचा भाजपला सवाल
  • ADVERTISEMENT

  • 04:50 PM • 16 Dec 2023

    Maharshtra Breaking News Live: प्रश्न आम्ही अदाणींना विचारतोय तर उत्तर भाजप का देतंय?

    अदाणींनी मुंबईसाठी काय केलंय?, एअरपोर्ट घेतला, पोर्ट घेतला आणि एलआयसी घेतली, बँका घेतल्या.. आता तुमची नजर आमच्या धारावीवर आली? मला तर कळतच नाही.. मी प्रश्न अदाणींना विचारतेय तर उत्तर भाजप का देतंय? अशी टीकाच काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
  • 04:32 PM • 16 Dec 2023

    Maharshtra Breaking News Live: अदानींच्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ठाकरे गट आक्रमक

    ठाकरेंच्या मोर्च्याला इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचा पाठिंबा, या पक्षात काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) देखील सहभागी झाले आहेत. मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर अदानींच्या मुंबईतील कार्यालयाला छावणीचं रुप.. कार्यालय परिसरात 300 पोलीस तैनात
  • ADVERTISEMENT

  • 02:23 PM • 16 Dec 2023

    Maharshtra Breaking News Live: ठाकरे सरकारला हा कायदा नको होता, पण शिंदेंनी.., अण्णा हजारेंचं मोठं विधान

    अहमदनगर - प्रदीर्घ लढ्यानंतर अखेर महाराष्ट्रात लोकायुक्त कायदा मंजूर झाला आहे. विधानसभेत मंजूर झालेला हा कायदा अखेर विधानपरिषदेत देखील मंजूर झाला आहे. मात्र राजकीय पक्षांना हा कायदा नको होता म्हणून एवढ्या दिवस हा कायदा झाला नाही. तसेच तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळात या कायद्याबाबत मला लेखी आशावासन देण्यात आले मात्र कायदा काही झाला नाही. ठाकरे सरकारला हा कायदा नको होता. फडणवीस व शिंदे सरकारच्या काळात यासाठी विलंब झाला मात्र त्यांनी कायदा मंजूर केला असे वक्तव्य ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून लोकपाल व लोकायुक्त कायद्यासाठीसंघर्ष करणारे ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारेंच्या मागणीला यश आले आहे. केंद्रासाठी लागू असलेला लोकपाल कायदा हा काही वर्षांपूर्वी मंजूर झाला होता, तर राज्यासाठी महत्त्वाचा असलेला लोकायुक्त कायदा हा प्रलंबित होता. दरम्यान या कायद्याबाबत तत्कालीन ठाकरे सरकारकडे देखील पाठपुरावा करण्यात आला होता याबाबत त्यांच्याकडून लेखी आशावासन देखील देण्यात आले मात्र त्याची अंमलबजावणी मात्र झाली नाही.अनेक राजकीय पक्षांना हा कायदा नको होता म्हणून हा कायदा मंजूर होण्यास विलंब झाला. विद्यमान सरकार म्हणजेच शिंदे फडणवीस सरकारला देखिल हा कायदा करण्यास वेळ लागला मात्र त्यांनी हा कायदा मंजूर केला यामुळे हा एक ऐतिहासिक असा निर्णय आहे असे मत यावेळी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजार यांनी व्यक्त केले.
  • 12:53 PM • 16 Dec 2023

    केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल

    दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यात केंद्रीय पथक दुष्काळ दाखल झाले आहे. आज बीडच्या घोडका राजुरी गावात केंद्रीय पथकाने पाझर तलावाची पाहणी केली तसेच बांधावर जाऊन शेतकऱ्याशी संवादही साधला यावेळी चारा टंचाई पाणीटंचाई या संदर्भात आढावा घेतला यावेळी या पथकासोबत जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
  • 11:53 AM • 16 Dec 2023

    Thane Priya Singh: प्रिया सिंहची वकील दर्शना पवार यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट

    ठाण्यातील प्रिया सिंह प्रकरणाबाबत वकील दर्शना पवार या प्रिया सिंग यांना भेटण्याकरिता हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. त्या दिवशी काय-काय झालं होतं याबद्दल दर्शना पवार यांनी प्रियाशी बराच वेळ चर्चा केली. परंतु मीडियाशी बोलण्यास दर्शना पवार यांनी नकार दिला आहे. प्रिया सिंह यांची वकील म्हणून दर्शना पवार कोर्टात तिची बाजू मांडणार आहेत.
  • 11:25 AM • 16 Dec 2023

    अदाणीच्या विरोधात मोर्चा निघू नये यासाठी दिल्लीतून दबाव होता: संजय राऊत

    हा मोर्चा शिवसेनेचा आहे, हा मोर्चा फक्त धारावी वाचवण्यासाठी नाही तर पुनरविकासाच्या नावाखाली tdr घोटाळा आहॆ. गुजराती लॉबी यामागे मोठी आहे. धारावीतील गरीब लोकांना घरं मिळायला हवी.. ते जिथे राहतात तिथे त्यांना व्यवसायासाठी जागा मिळायला हवी. मुंद्रा बंदरात मोठ्या प्रमाणात ड्रग्स उतरतात अशा लोकांच्या हातात धारावी दिली तर इथेही ड्रग्सचा व्यापार करायचा आहे का?भारतातील सर्वात मोठा tdr घोटाळा धारावीत होणार आहे. हा मोर्चा निघू नये, अदाणीच्या विरोधात मोर्चा निघू नये यासाठी दिल्लीतून दबाव होता, तो दबाव झुगारून आम्ही मोर्चा काढतोय. Tdr घोटाळा बाहेर आला की, भाजपचे हात यात किती बरबटलेले ते समोर येईल. दिल्लीच्या मदतीने धारावी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वात मोठा टीडीआर घोटाळा होणार आहे
  • 10:36 AM • 16 Dec 2023

    अयोध्या राममंदिर अक्षता कलश श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये

    आयोध्येतील राममंदिर उद्घाटन 22 जानेवारी महिन्यात होणार असून संपूर्ण भारतभर अक्षता कलश येत असून आज पंढरपूर मधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सकल हिंदू समाजाचे स्वयंसेवक अक्षता कलश श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले असून राममंदिर उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. आज दुपारी तीन वाजता अक्षता कलश शोभा यात्रा निघणार असून संपूर्ण पंचक्रोशीतील हजारो भाविक दर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत.
  • 09:50 AM • 16 Dec 2023

    Marathi News live updates: राजापूर बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या हालचालींना वेग

    प्रस्तावित राजापूर बारसू रिफायनरी प्रकल्पामुळे माझ्या कोकणच्या विकासाला नवा आयाम मिळणार असून हा प्रकल्प राजापूर तालुक्यातच रिफायनरीच्या प्रस्तावित जागी होणार असल्याची ग्वाही केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उदयोगमंत्री नारायणराव राणे यांनी रिफायनरी  प्रकल्प समर्थक समन्वय समितीला दिली आहे. तर या प्रकल्पाबाबत केंद्रीय पेट्रोलिय मंत्र्यांची आपण स्वत: पुढील आठवडयात भेट घेणार आहोत. त्यानंतर जानेवारी महिन्यात राजापूरात केंद्रीय उद्योग विभाग व  राज्य शासनाचा औद्योगिक विभागाची संयुक्त बैठक घेवून या प्रकल्पाबाबतची भूमिका जनतेसमोर  मांडणार असल्याची ग्वाहीही नाम. राणे यानी यावेळी दिली.
  • 09:46 AM • 16 Dec 2023

    Marathi News Live Update: धारावीच्या पुर्नविकास प्रकल्पाविरोधात ठाकरे गटाचा आज मोर्चा, जय्यत तयारी

    धारावी बचावचा नारा देत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने शनिवारी (16 डिसेंबर) धारावीत मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. खुद्द उद्धव ठाकरे यांनी या आघाडीचे नेतृत्व करण्याची घोषणा केली आहे. या सभेसाठी आता ठाकरे गटाकडून जोरदार तयारीही करण्यात आली आहे.
follow whatsapp

ADVERTISEMENT