लाइव्ह
Maharashtra News Live Update : आमदार रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीचा छापा!
Marathi News Live Update : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांनी प्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या वादावरच आता भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘प्रभू श्रीरामचंद्रांवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेले वक्तव्य हे एक प्रकारची सामाजिक विकृती आहे. अशी वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.’ अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 02:08 PM • 05 Jan 2024
Marathi News Live Update : मड्यावरच्या टाळूवरचं लोणी खातात- जरांगे पाटलांचं भुजबळांवर टीका
सध्या जरांगे पाटील यांचा मराठा संवाद दौरा सुरू आहे. त्यांच्या या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावेळी पाटलांनी भुजबळांवर निशाणा साधत मोठं विधान केलं आहे. छगन भुजबळ हे मड्यावरच्या टाळूवरचं लोणी खातात आणि हे खाऊन खाऊन ते बोका झाले आहेत.' असं थेट जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. - 01:40 PM • 05 Jan 2024
Marathi News Live Update : खाकी वर्दीला हात लावण्याची हिंमत आमदारामध्ये कशी?- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
'आमदार सुनील कांबळे यांनी कानशिलात लगावल्याच्या घटनेनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांचा समाचार घेतला आहे. ''काल अब्दुल सत्तार आणि आज भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी सत्तेचा माज दाखवला. भाजप आमदाराची मस्ती इतकी की ड्युटीवर असलेल्या पोलीस जवानाच्या थोबाडीत हाणली, थेट खाकी वर्दीला हात घालण्याची हिंमत सत्ताधारी आमदार मध्ये आली कशी? गृहमंत्री याची दखल घेणार का? पोलिस अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावर कारवाई करावी, नाहीतर पोलिसांवर तक्रार न करण्याचा दबाव ही टाकला जाऊ शकतो.' असं ट्वीट विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. - 12:52 PM • 05 Jan 2024
Marathi News Live Update : रामदास आठवलेंनी राम मंदिर उद्दाटन सोहळ्याविषयी केलं महत्त्वाचं वक्तव्य
“सर्व पुरावे तपासल्यानंतरच ती जागा राम मंदिराला दिली. राममंदिर झाले की न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे मशीद बांधावी. राम मंदिर कार्यक्रमासाठी सर्वांना निमंत्रण. हा सोहळा भाजपाचा नाही. रामजन्म भूमी ट्रस्टचां हा सोहळा आहे. ज्याला रामाबद्दल आदर आहे, त्यांनी त्याठिकाणी जावे. मी ही अयोध्येला जाणार आहे” असं रामदास आठवले म्हणाले. - 12:40 PM • 05 Jan 2024
Marathi News Live Update : आमदार रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीचा छापा!
बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी छापेमारी करण्यात आली आहे. मुंबईसह सहा ठिकाणी ईडीची ही छापेमारी करण्यात आली आहे. चार जणांच्या पथकाने हा छापा मारला. कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल ताब्यात घेऊन तपासणी केली जात आहे. तर, गेल्या 2 तासापासून ईडी कडून तपासणी सुरू आहे. - 12:29 PM • 05 Jan 2024
चौका चौकात उलटं टांगून यांच्या चामड्या काढल्या पाहिजेत- आमदार किशोर पाटील यांची जहरी टीका
'संजय राऊत व जितेंद्र आव्हाड यांना चौका चौकात उलटं टांगून यांच्या चामड्या काढल्या पाहिजेत. त्याशिवाय यांचे डोके ठिकाणावर येणार नाही. जितेंद्र आव्हाडसारखा विकृत माणूस माझ्या जीवनात पाहिला नाही.' शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी राऊत आणि आव्हाडांवर सडकून टीका केली. - 12:12 PM • 05 Jan 2024
MLA Disqualification: राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणी वेळापत्रक ठरले!
6 जानेवारी 2024 - राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये याचिका आणि त्यावरील उत्तराची कागदपत्रे एकमेकांना सोपवली जातील.8 जानेवारी 2024 - याचिकेसाठी अधिकची, अतिरिक्त माहिती जोडण्यासाठी वेळ.9 जानेवारी 2024 - फाईल्स किंवा अधिकची, अतिरिक्त कागदपत्रे पटलावर आणणे. मात्र, 9 तारखेनंतर ऐनवेळी कोणतीही नवी कागदपत्रे जोडता येणार नाही. अशा मागणीचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्टपणे बजावण्यात आले आहे.11 जानेवारी 2024 - याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणी. पहिल्या दिवशी शरद पवार गट अजित पवार गटाकडून सादर झालेली कागदपत्रे तपासेल.12 जानेवारी 2024 - याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणीचा दुसरा दिवस. अजित पवार गटाकडून शरद पवार गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची पाहणी केली जाईल.14 जानेवारी 2024 - सुनावणीच्या कामकाजात कागदपत्रांचा समावेश करण्यासाठी किंवा एखादे कागदपत्र वगळण्यासाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस असेल.16 जानेवारी 2024 - विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी. सुनावणीचे विषय नक्की केले जातील.18 जानेवारी 2024 - प्रतिज्ञापत्र सादर करणे.20 जानेवारी 2024 - अजित पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी23 जानेवारी 2024 - शरद पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी25 आणि 27 जानेवारी 2024 - राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे अंतिम युक्तीवाद - 11:46 AM • 05 Jan 2024
Marathi News Live Update : अंगणवाडी सेविकांचं विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन
अंगणवाडी सेविकांचं विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. संपावर गेलेल्या अंगणवाडी सेविकांना नोटीस बजावण्यात आली आहे. नोकरीवरुन कमी करण्याबाबत अंगणवाडी सेविकांना नोटीस बजावण्यात आली आहे. - 11:01 AM • 05 Jan 2024
Marathi News Live Update : प्रभू श्रीराम काय खायचे माहीत नाही, पण राष्ट्रवादीवाले...- संदीप देशपांडेंचा टोला
'प्रभू श्रीराम काय खायचे माहीत नाही, पण राष्ट्रवादीतले नेते पैसे खायचे हे नक्की,' जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जहरी टीका केली आहे. - 10:21 AM • 05 Jan 2024
Marathi News Live Update : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुलाचा शाही विवाहसोहळा
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुलाचा विवाह होत आहे. सहारा सिटीतील 70 एकर परिसरात हा शाही विवाह सोहळा होतोय. अडीच हजार स्क्वेअर फुटावर स्वागत समारंभाचा स्टेज उभारला गेला आहे. 50 हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह उध्दव ठाकरे आणि राज्यातील बडे नेते उपस्थित राहणार आहेत. - 10:20 AM • 05 Jan 2024
Marathi News Live Update : जागावाटपाबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात – संजय राऊत
'जागावाटपाबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. जागावाटपाबाबत मतभेद नाहीत. वंचितला मविआचा महत्वाचा घटक आम्ही मानतो,' असे संजय राऊत म्हणाले. - 09:45 AM • 05 Jan 2024
Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर!
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांनी विविध विकासकामांची पाहिणी केली. सकाळी 6 वाजल्यापासूनच अजित पवार यांचा पाहाणी दौरा हा सुरू झाला आहे. पुण्याच्या सरकिट हाऊसची देखील त्यांनी पाहाणी केली. - 09:17 AM • 05 Jan 2024
Maharashtra News : अब्दुल सत्तारांच्या शिवीगाळ प्रकरणानंतर सिल्लोड येथे नागरिक आक्रमक
अब्दुल सत्तार यांच्या शिवीगाळ प्रकरणानंतर नागरिक आक्रमक झाले आहेत. सिल्लोडमधील कसोड गावात सत्तारांचे बोर्ड नागरिकांनी फेकून दिले आहे. सत्तारांच्या शिवीगाळ प्रकरणानंतर वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय. - 09:15 AM • 05 Jan 2024
Marathi News Live Update : पंकजा मुंडेंचा सरकार विरोधात आंदोलनाचा इशारा
पंकजा मुंडे यांनी सरकार विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. याशिवाय उसतोड कामगारांच्या प्रश्नांवर पवार-मुंडेची चर्चा झाली आहे. उसतोड कामगारांना 34 टक्के दरवाढ देण्यात येणार आहे. - 08:58 AM • 05 Jan 2024
Marathi News Live Update : महाराष्ट्रातील जागावाटपाचा प्रश्न सुटेना नाना पटोलेंनी जाहीर केली पुढची तारीख!
महाविकास आघाडीचा राज्यातील जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे, असे तिन्ही पक्षांचे नेते बोलत असले तरी जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी आणखी ८ ते १० दिवस लागतील, असे सांगून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा जागावाटप जाहीर करण्याची पुढची तारीख दिली आहे. - 08:19 AM • 05 Jan 2024
Marathi News Live Update : उद्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंची जाहीर सभा
गिरगावच्या फणसवाडीत आदित्य ठाकरेंची उद्या शनिवार 6 डिसेंबर रोजी जाहीर सभा होणार आहे. दक्षिण मुंबईत लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंची ही जाहीर सभा होत आहे. गिरगांव येथे विभाग क्रमांक 12 च्या वतीनं आदित्य ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. दक्षिण मुंबईत ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली, तर अरविंद सावंत यांना भाजपकडून आव्हान असण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT