Maharshtra Breaking News Live : 'अबकी बार भाजप तडीपार', जाहीर सभेत उद्धव ठाकरेंची टीका!
लोकसभा निवडणूक तोंडावर असताना भाजपकडून 195 उमेदवाराच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तसंच, महाविकासआघाडीच्या 48 पैकी 42 उमेदवारांची नावं निश्चित झाल्याची माहिती आहे. या आणि अशाच राजकीय अपडेट्स जाणून घेण्यासाठी 'मुंबई तक'चा लाईव्ह ब्लॉग वाचा.
ADVERTISEMENT
Marathi News Live Update : भाजपने जाहीर केलेल्या 195 उमेदवारांच्या यादीत कृपाशंकर सिंह यांना उमेदवारी मिळाली आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर झाली नसली तरी महाराष्ट्राचे माजी गृह राज्यमंत्री असलेल्या कृपाशंकर सिंह यांना उत्तर प्रदेशमधील त्यांच्या जौनपूर जिल्ह्यातून लोकसभा लढविण्याची संधी भाजपच्या कृपेने मिळाली आहे. ज्या नितीन गडकरींनी भाजपासाठी काम केले त्यांना मात्र तिकीट मिळाले नाही. ज्यांचावर आरोप केले त्या कृपाशंकर सिंह यांना भाजपाने तिकीट दिले असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 07:12 PM • 03 Mar 2024
ईव्हीएम घोटाळा केला देशात मोठा असंतोष उसळेल- उद्धव ठाकरे
भाजपविरोधात देशात नाराजी आहे, ईव्हीएम घोटाळा करून ते जिंकलेच तर देशात मोठा असंतोष उसळेल, असा इशारा उद्वव ठाकरेंनी दिला.
- 06:59 PM • 03 Mar 2024
'अबकी बार भाजप तडीपार', जाहीर सभेत उद्धव ठाकरेंची टोलेबाजी!
आज उद्धव ठाकरेंची जाहीर सभा धारावीत पार पडत आहे. यावेळी सभेत बोलताना ते म्हणाले की, 'अशोक चव्हाण भाजपसोबत जातील असं वाटलं नव्हतं. मोदींनी जाहीर केलेल्य पॅकेजपैकी किती निधी बिहारला मिळाला? मोदींकडून केवळ फसवाफसवी सुरू आहे. आम्हीही मोदींच्या भूलथापांना फसलो होतो. कामांपेक्षा आता केवळ नावं बदलणं सुरू आहे. मोदी गॅरंटी म्हणजे जुमला, भाजपची खरी ओळख गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांमुळे आहे. गडकरींनी अनेक चांगली कामे केली. पण त्यांचं नाव पहिल्या यादीत नाही. अबकी बार भाजप तडीपार, यात निष्ठावंत गडकरींचं नाव नाही ही कुठली गॅरंटी?' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडले.
- 06:49 PM • 03 Mar 2024
आम्ही योग्यवेळी योग्य निर्णय घेतो- नवनीत राणा
'आम्ही एनडीएसोबत असून आम्ही योग्यवेळी योग्य निर्णय घेतो,' अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली आहे. भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळेल आणि त्यांचा भाजपप्रवेश होईल, अशा सध्या चर्चा आहेत.
- 06:48 PM • 03 Mar 2024
शासन आपल्या दारी हा कार्यक्रम लोकांच्या जीवनात बदल घडवण्याचा आहे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कल्याण शीळ रोड येथील प्रीमियर मैदानात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम लोकांच्या जीवनात बदल घडवण्याचा आहे, असं शिंदे यांनी म्हटलं.
- 06:06 PM • 03 Mar 2024
मी थांबणार नाही, प्रत्येक मराठाच्या घरात हाल होत आहेत- मनोज जरांगे पाटील
'आपला मराठा आरक्षण लढा अंतिम टप्प्यात आला होता मात्र काही विघ्न संतोशी लोक होते. त्यांना असे वाटत होते लांब नेले म्हणजे थांबेल मात्र आम्ही थांबणार नाही. प्रत्येक मराठाच्या घरात हाल होत आहेत. 350 पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केली. हजारो तरुणावर गुन्हे नोंद केले गेले. आता विषय अंतिम टप्प्यात आला फक्त सगेसोयरे अंमलबजावनी करुन द्यायची', असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
- 02:12 PM • 03 Mar 2024
भाजपने दिले लोकसभेचे तिकीट, पण अभिनेत्याने नाकारले
लोकसभा निवडणुकीसाठी 2024 भाजपने शनिवारी 195 उमेदवारांची यादी जाहीर करून मोठी आघाडी घेतली आहे. पण दुसऱ्याच दिवशी एका उमेदवाराने तिकीट नाकारल्याने पक्षावर नामुष्की ओढवली आहे. भोजपुरी अभिनेता पवन सिंह याची भाजपने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्याने म्हटले आहे की, 'भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचा मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून आसनसोल मतदारसंघातून मला उमेदवार घोषित केले. पण काही कारणास्तव मी आसनसोल मधून निवडणूक लढू शकणार नाही.' असं पवन सिंह याने स्पष्ट सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT