लाइव्ह
Maharashtra Breaking News Live : नवाब मलिक आमच्यासोबत कदापि राहू शकत नाही, भाजप नेता स्पष्टच बोलला
MLA Disqualification hearing LIVE Marathi News Live updates : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील स्वच्छतेची आज पाहणी करणार आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा राज्यभर दौरे सुरु आहेत. आमदार अपात्रतेच्या सुनावणीला आज सुरुवात होणार आहे. सध्या शिंदे गटाची उलटतपासणी सुरु आहे. यासह सर्व ताजे अपडेटस् आणि राज्याच्या विविध भागातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एकाच ठिकाणी…
ADVERTISEMENT
marathi news live updates mla dis disqualification hearing eknath shinde vs uddhav thackeray maratha reservation devendra fadnavis vijay wadettiwar maharashtra news
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 10:00 PM • 09 Dec 2023
Marathi News Live updates : कराडच्या कोल्हापूर नाक्यावर ‘मनसे’चे ‘खळखट्याक’ आंदोलन
कराड व मलकापूर शहरासह तालुक्यातील दुकानांच्या इंग्रजी पाट्या काढून मराठा पाट्या लावाव्यात यासाठी निवेदन देऊन पंधरावडा उलटला तरी अद्याप कार्यवाही झाली नाही. त्यामुळे शनिवारपासून मनसेने खळखट्याक आंदोलन सुरु केले आहे. मनसेचे तालुका प्रमुख दादासाहेब शिंगण यांनी कोल्हापूर नाक्याजवळ असलेल्या एका ऑफिसचा इंग्रजी फलक फाडून त्या ठिकाणी मराठी पाट्या लावा अन्यथा हा ट्रेलर आहे काही दिवसांनी मनसे तुम्हाला पिक्चर दाखवले असा इशारा मनसेने दिला आहे. - 09:00 PM • 09 Dec 2023
Marathi News Live updates : जेल पोलिसाने स्वतःवर गोळी झाडून केल आत्महत्येचा प्रयत्न, वरिष्ठांच्या त्रास
सोलापूर जेल पोलिसाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा मोबाईल स्टेट्स ठेवत त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरत रायफलमधून स्वतःवर 3 गोळ्या झाडून घेतल्या आहेत. जखमी पोलीस कॉन्स्टेबल विकास गंगाराम कोळपे यांच्यावर सोलापूर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांच्या मोबाईल स्टेटसमध्ये साठे आणि देसाई अधिकाऱ्यांच्या त्रासाचा करण्यात आला आहे. - 08:21 PM • 09 Dec 2023
Marathi News Live updates :गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक, अंगावर चपला फेकल्या
इंदापुरात ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्यानंतर धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना मराठा बांधवाकडून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. इंदापूरात गेल्या 47 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणा शेजारीच दुधाला दरवाढ मिळण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणाला भेट देण्यासाठी गोपीचंद पडळकर सभा संपल्यानंतर जात होते. त्यावेळी मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी पडळकर गो बॅक अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. यावेळी बाचाबाचीही झाली, व त्यांच्या अंगावर चपला फेकल्याचादेखील प्रकार घडला आहे. - 07:47 PM • 09 Dec 2023
Marathi News Live updates : पुण्याचे 6 जण देवगड समुद्रात बुडाले, 4 जणांचे मृतदेह सापडले
पुणे येथील संकल्प सैनिक अकॅडमीची सहल देवगडला गेली होती. त्यावेळी देवगड समुद्रात आनंद लुण्यासाठी हे सर्वजण उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने 6 जण बुडाले आहेत. देवगड समुद्रात बुडालेल्या 6 जणांपैकी 4 जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर एकाचा जीव वाचला आहे. प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिषा पडवळ, पायल बनसोडे अशी चारही मृत झालेल्यांची नावं आहेत. तर वाचवण्यात यश आलेल्याचे आकाश तुपे असे नाव आहे. तर राम डिचवलकर हा अद्यापही बेपत्ता आहे. - 04:44 PM • 09 Dec 2023
Marathi News Live updates : नवाब मलिक आमच्यासोबत कदापी राहू शकत नाही, भाजप नेता स्पष्टच बोलला
नबाब मलिकांबद्दल गेल्या दोन दिवसांपासून सांगतोय. मलिकांबाबत आमची भूमिका स्पष्टच आहे. नबाब मलीक आमच्या सोबत राहू शकत नाही. राहणार नाही, राहणार नाही. याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. - 04:20 PM • 09 Dec 2023
Marathi News Live updates : राऊतांचा शिव्याशाप दिल्याशिवाय दिवस जात नाही, शिंदेंच्या नेत्याची टीका
संजय राऊत हे कधीही चांगले बोलू शकत नाही. राऊत यांना सकाळी शिव्या शाप दिल्याशिवाय दिवस जात नाही, अशी टीका मंत्री शंभुराज देसाई यांनी केली आहे. कोणत्या पुण्यकर्मासाठी 110 दिवस जेलमध्ये होतात. त्या प्रश्नाचे पहिले उत्तर द्या, मग आमच्या सरकारवर टीका करा, असे शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे. - 02:42 PM • 09 Dec 2023
Mla Disqualification Hearing : शिंदेंच्या खासदाराची उलटतपासणी पूर्ण, आमदार अपात्रता सुनावणीत काय घडलं?
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची उलटतपासणी पूर्ण झाली आहे. आता दिपक केसरकर यांची उलटतपासणी होणार आहे. या सुनावणीला सोमवारी सकाळी 8.30 वाजता सुरुवात होणार आहे. - 01:38 PM • 09 Dec 2023
Marathi News Live updates : 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही तर..., जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
मराठा आरक्षणावर आमचं बारकाईने लक्ष आहे. सरकार, मंत्री, आमदार काय भूमिका मांडतात त्यावरही आमचं बारकाईने लक्ष आहे. मराठा आणि महाराष्ट्र काय आहे, येत्या 24 डिसेंबर नंतर कळेल, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.देवेंद्र फडणवीस त्यांचे स्टेटमेंट बदलतील. एकाच्या दबावात येऊन ते बोलत आहेत. थोडं थांबा फडवणीस साहेब, आरक्षण मिळवण्याची ताकत मराठा समाजात आहे, असेही जरांगे पाटील म्हणाले आहेत. - 12:42 PM • 09 Dec 2023
Mla Disqualification Hearing : लोकसभेच्या 11 सदस्यांनी एकनाथ शिंदेंचे नेतृत्व कधी स्विकारलं? राहुल शेवाळे म्हणाले...
ठाकरे गट वकील : 12 लोकसभा सदस्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता कधी मानलं? राहुल शेवाळे : तारीख आठवत नाही. ठाकरे गट वकील : पॅरा 15 ऑफ सिम्बॉल ऑर्डर यांच्या एकनाथ शिंदे यांच्या याचिका दाखल होण्याआधी एकही लोकसभेतील खासदारांचा पाठिंबा तुम्हाला नव्हता ? राहुल शेवाळे : नाही. हे चूक आहे. ठाकरे गट वकील : मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की एकनाथ शिंदे यांना कुठल्याही शिवसेना लोकसभा सदस्याचा 20 जून 2022 आधी पाठिंबा नव्हता? राहुल शेवाळे : नाही, हे बरोबर नाही. - 12:22 PM • 09 Dec 2023
Marathi News Live updates : ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपी ललित पाटीलला न्यायायलयात हजर करणार
ड्रग्ज तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधार ललित पाटील याचा ताबा मुंबई पोलिसांकडून शुक्रवारी नाशिक पोलिसांनी घेतला. त्यानंतर नाशिकमध्ये आणून आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे. - 12:15 PM • 09 Dec 2023
Marathi News Live updates : तुम्ही सगळे नवाब मलिकांचे बाप, संजय राऊतांचा कुणावर निषाणा?
नवाब मलिक प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिण्याचे एक नाटक केले आहे, हा एक ड्रामा होता. प्रफुल पटेल आणि नवाब मलिक या दोघांचे अपराध सारखे आहेत, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले तसेच आज सकाळी शिंदे गटाचा पोपट बोलत होता. आम्ही मलिकाच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही,अरे मग तुम्ही सगळे नवाब मलिक यांचे बाप आहेत, अशी टीका राऊतांनी शिंदे गटावर केली. - 11:05 AM • 09 Dec 2023
Mla Disqualification Hearing Live : 1998 नंतर बाळासाहेबांनी कुठल्याच प्रक्रियेच पालन केलं नाही? शेवाळेंनी दिले उत्तर
ठाकरे गट वकील : उद्धव ठाकरे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवायचे का? राहुल शेवाळे : पूर्वीपासून ती परंपरा चालत आलेली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासूनची ही परंपरा होती. किती वर्षापासून सूरू आहे, याची मला कल्पना नाही. ठाकरे गट वकील : 1998 नंतर बाळासाहेबांनी कुठलीही प्रोसिजर फॉलो केली नाही असे आपले म्हणणे आहे का ? राहुल शेवाळे : 1998 नंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रोसिजर फॉलो केली नाही हे मी कुठेच बोललो नाही. मी सांगितलं आहे की बाळासाहेब असताना त्या प्रोसिजर फॉलो केल्या गेल्या. - 10:42 AM • 09 Dec 2023
Marathi News Live updates : बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी शाकिब नाचन एनआयएच्या ताब्यात
घाटकोपर बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी शाकिब नाचनला राष्ट्रीय तपास संस्थने (NIA) ने आज ठाण्यातून अटक केली आहे. शाकिब नाचनला घाटकोपर बॉम्बस्फोटात दोषी ठरवण्यात आले आहे. हा आरोपी त्या मॉड्यूलचा भाग आहेत ज्यांनी देशभरात 40 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची योजना आखली होती. - 10:33 AM • 09 Dec 2023
Mla Disqualification Hearing Live : 23 जानेवारी 2018 च्या बैठकीत शिवसेनेच्या घटनेत बदल करण्यात आले होते का?
ठाकरे गट वकील : 23 जानेवारी 2018 रोजी बैठक झाली का? या बैठकीत शिवसेना पक्षाच्या घटनेत काही बदल करण्यात आले होते का ? राहुल शेवाळे : अशी कुठलीही बैठक झालेली नव्हती. त्यामुळे पक्षाची घटना बदलण्याचा प्रश्न येत नाही. - 10:30 AM • 09 Dec 2023
Mla Disqualification Hearing Live : शिवसेना पक्षाची घटना कधी आणि कोणी बनवली?
शिवसेना पक्षाची घटना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बनवली आहे आणि निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार 1999 नुसार ते अंमलात आली आहे. त्यानंतर त्यात काही अमेंडमेंट करण्यात आले नाही, असे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरेंच्या वकिलाला उत्तर दिले आहे. - 09:31 AM • 09 Dec 2023
Mla Disqualification Hearing Live : 25 जून 2022 ला सेना भवनात काय घडलं? राहुल शेवाळे म्हणाले...
25 जून 2022 ला मी सेना भवनात गेलो होतो. त्यावेळी जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती त्या अनुषंगाने आम्ही सर्व खासदारांनी 25 जून 2022 पूर्वी एक बैठक घेतली होती. या बैठकीत आम्ही उद्धव साहेबांना आपण पुन्हा एकदा एनडीएमध्ये जाऊ अशी विनंती केली होती. 25 तारखेला उद्धव ठाकरे यांना खासदारांच्या भावना सांगितल्या. देशावर मोदीजींच्या नेतृत्वात चांगल काम चालू आहे आणि 2024 मध्ये आपण महायुती आणि एनडीए सोबत लढावं असे आम्ही खासदारांनी त्यांना विनंती केलेली होती. - 09:09 AM • 09 Dec 2023
Marathi News Live updates : मुंबई, पुण्यासह देशभरात NIAच्या 41 ठिकाणी धाडी
मुंबई, पुण्यासह देशभरात आज पहाटे राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) 41 ठिकाणी कारवाई सुरु केली आहे. इसिस प्रकरणात हे छापे टाकण्यात आले आहेत. पुणे पोलिसांनी 18 जुलै रोजी दोन दशतवाद्यांना अटक केली होती. त्यानंतर इसिस मॉड्यूलचा धक्कादायक खुलासा झाला. या प्रकरणाची व्याप्ती पाहून तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) कडे देण्यात आला. आज शनिवारी एनआयएनने पुणे, ठाणे, मिरा भाईंदर परिसरात धाडी टाकल्या. - 08:57 AM • 09 Dec 2023
Mla Disqualification Hearing Live: 23 जानेवारी 2018 ला काय झालं होतं?, ठाकरेंच्या वकिलाचा शेवाळेंना सवाल
23 जानेवारी हा आम्हा सर्व शिवसैनिकांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. या दिवशी सर्व राज्यभरातील शिवसैनिक एकत्र येतात आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करतात. त्यादिवशी पक्षातील सर्व नेते एकत्र येतात, भाषणे होतात. भविष्यातील दिशा ठरविले जाते आणि सर्व शिवसैनिक आपापल्या ठिकाणी परत जातात, हेच त्या दिवशी झाले होते. - 08:48 AM • 09 Dec 2023
Mla Disqualification Hearing Live:आमदार अपात्रता सुनावणीला सुरुवात
आमदार अपात्रतेच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या उलटतपासणी सूरू आहे. तुम्ही शिवसेनेचे कधीपासून सदस्य आहात? असा सवाल त्यांना ठाकरे गटाच्या वकिलाने विचारला आहे. यावर राहुल शेवाळे यांनी सन 2000 पासून असे उत्तर दिले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT