Meta ची घोषणा, तयार करत आहेत जगातील सर्वात वेगवान Supercomputer

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कॅलिफोर्निया: Meta सध्या एका सुपर कॉम्प्युटरवर काम करत आहे. Mark Zuckerberg ने घोषणा केली आहे की, त्यांची कंपनी जगातील सर्वात वेगवान कृत्रिम बुद्धिमत्ता असलेला सुपर कॉम्प्युटर तयार करत आहे. जो त्याच्या मेटाव्हर्स योजनेचा एक भाग आहे. मार्क झुकरबर्गने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले आहे की, मेटाव्हर्स ही एक संकल्पना आहे जी फिजिकल आणि डिजिटल वर्ल्डला व्हर्च्युअल आणि ऑगमेंटेड रियालिटीच्या मदतीने बदलून टाकेल.

कंपनीने घोषणा केली आहे की त्यांनी AI Research SuperCluster (RSC) विकसित केले आहे. मेटा दावा करते की हा जगातील सर्वात वेगवान एआय सुपर कॉम्प्युटरपैकी एक आहे. कंपनीचा दावा लक्षात घेतल्यास संपूर्णपणे तयार झाल्यानंतर हा जगातील सर्वात वेगवान ऑपरेटिंग सुपर कॉम्प्युटर असेल. जो या वर्षाच्या मध्यापर्यंत तयार होऊ शकतो.

मार्क झुकरबर्गने त्याच्या ब्लॉगपोस्टमध्ये स्पष्ट केले, ‘मेटाव्हर्ससाठी आम्ही जो सुपर कॉम्प्युटर तयार करत आहोत त्यासाठी प्रचंड संगणकीय शक्ती आवश्यक आहे आणि RSC नवीन AI मॉडेल्स सक्षम करेल. जे लाखो उदाहरणांमधून शिकू शकतात, शेकडो भाषा समजू शकतात आणि बरेच काही करू शकतात.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मेटा संशोधकांच्या मते, हा आपल्या प्रकारचा सर्वात वेगवान संगणक असेल. या वर्षीच्या उन्हाळ्यापर्यंत तa तयार होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. डेटा स्टोरेज कंपनी प्युअर स्टोरेज आणि चीप मेकर Nvidia देखील या सुपर कॉम्प्युटरचा भाग आहेत. मेटा ने आज प्रकाशित केलेल्या ब्लॉगमध्ये AI सुपर कॉम्प्युटिंगची मोठ्या प्रमाणावर गरज असल्याचे सांगितले.

ADVERTISEMENT

कंपनीच्या म्हणण्यानुसार, मेटा स्केलवर एआयला मोठ्या प्रमाणात संगणकीय उपायांची आवश्यकता असते जे डेटाच्या वाढत्या प्रमाणाचे वेगवान विश्लेषण करण्यास सक्षम असेल. Pure Storageचे CTO Rob Lee यांच्या मते, मेटाचे आरएससी हे सुपर कॉम्प्युटिंगमधील एक मोठे यश आहे. जे नवीन तंत्रज्ञानाचा अनुभव प्रदान करेल.

ADVERTISEMENT

Facebook चं नाव आता Meta, युझर्सवर काय होणार परिणाम?

गेल्या काही वर्षांत, Meta (पूर्वीचे Facebook) वर गोपनीयता आणि डेटा धोरणाबाबत अनेक आरोप झाले आहेत. मेटा संशोधकांचे म्हणणे आहे की RSC अनेक हजार प्रोसेसरने बनलेले आहे, जे प्लॅटफॉर्मवर उपस्थित हानीकारक सामग्री शोधण्यात मदत करू शकते. Meta सुरक्षा आणि गोपनीयता समस्यांचे त्वरित निराकरण करण्याचा प्रयत्न करते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT