सोमय्या धाडस दाखवतील का?; नारायण राणेंच्या बंगल्यांची नाव घेत वैभव नाईकांनी दिलं आव्हान
शिवसेनेचे सचिव व उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या दोपालीतील बंगल्याचं अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी नार्वेकरांच्या बंगल्याचा व्हिडीओ ट्विट केल्यानंतर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सोमय्यांना आव्हान दिलं आहे. नार्वेकरांच्या बंगल्याची पाहणी करण्यासाठी येणार असाल, तर सिंधुदुर्गमध्ये या आम्ही नारायण राणेंची अनधिकृत बांधकामे दाखवतो’, असं म्हणत वैभव नाईकांनी […]
ADVERTISEMENT
शिवसेनेचे सचिव व उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या दोपालीतील बंगल्याचं अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी नार्वेकरांच्या बंगल्याचा व्हिडीओ ट्विट केल्यानंतर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सोमय्यांना आव्हान दिलं आहे. नार्वेकरांच्या बंगल्याची पाहणी करण्यासाठी येणार असाल, तर सिंधुदुर्गमध्ये या आम्ही नारायण राणेंची अनधिकृत बांधकामे दाखवतो’, असं म्हणत वैभव नाईकांनी यादीच वाचून दाखवली.
ADVERTISEMENT
मिलिंद नार्वेकर ते नारायण राणे… काय म्हणाले वैभव नाईक?
‘मिलिंद नार्वेकरांना बंगला बांधताना CRZ कायद्याचं उल्लंघन झाल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ बांधलेला बंगला पाडण्यास सुरवात केलीये. अशा प्रकारे बांधलेला बंगला पाडण्याचं धाडस मिलिंद नार्वेकर यांनी दाखवून राजकारणात एक चांगला पायंडा पाडला आहे. सदर बंगल्याला स्थानिक तहसील किंवा तलाठी यांच्याकडून कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नाहीये, तरी किरीट सोमय्या चुकीची माहिती पसरवत आहेत’, असं आमदार वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
‘अनावधानाने का होईना बांधकाम अनधिकृत असेल, तर ते स्वत: तोडण्याचं धाडस आज मिलिंद नार्वेकर यांनी दाखवलं आहे. असं धाडस आता भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे दाखवणार आहेत का? नारायण राणे यांचा मुंबईतील जुहू येथील १२ मजली बंगलाही CRZ कायद्याचं उल्लंघन करून बांधला आहे. तसेच नारायण राणे यांचे सिंधुदूर्गातही अनेक अनधिकृत CRZ कायद्याचं उल्लंघन करून बांधलेली बांधकामं आणि बंगले आहेत. ते आम्ही किरीट सोमय्या यांना दाखवू’, असं वैभव नाईक म्हणाले.
किरीट सोमय्या यांनी त्यांच्याच पक्षातील नेत्यांची CRZ कायद्याचं उल्लंघन करणारी अनधिकृत बांधकामं तोडण्यासंदर्भातही बोलावं. आणि जसा मिलिंद नार्वेकर यांना स्वत:हून बांधकाम पाडण्याचा पायंडा पाडलांय तसा भाजपचेही नेते आणि केंद्रीय मंत्री दाखवणार आहेत का?’, असं आव्हान वैभव नाईक यांनी दिलं आहे.
ADVERTISEMENT
‘नारायण राणे यांचा जुहूमधील ‘अधीश’ बंगला सीआरझेड कायद्याचं उल्लंघन करून बांधला आहे. तहसिलदारांनी त्यांना नोटीस दिलेली आहे. इतर विभागानीही पाडण्याची नोटीस दिलेली आहे. नारायण राणे हे बांधकाम पाडण्याचं धाडस दाखवणार का? त्यासाठी किरीट सोमय्या काय करणार आहेत?’, असं वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
‘किरीट सोमय्या मिलिंद नार्वेकर यांनी स्वतःहून पाडलेलं बांधकाम बघायला जाणार आहेत. त्यांनी तिथून शंभर किमी अंतरावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा राणेंचा मालवणीतील बंगला, मल्टिप्लेक्स थिअटर्स आणि अशी अनेक अनधिकृत बांधकाम आहेत, जी आम्ही सोमय्यांना दाखवू. ही बांधकामं पाडण्यासाठी किरीट सोमय्या यावर आवाज उठवतील का?’, असा सवाल वैभव नाईक यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT