क्वारंटाईनमध्ये असलेल्या मिलिंद सोमणला पीपीई कीट घालून भेटायला गेली अंकिता

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशात कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय. बॉलिवूडवरही कोरोनाचं सावट आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता मिलिंद सोमणला कोरोना झाल्याची माहिती त्याने दिली होती. मिलिंदने स्वतःला क्वारंटाईन करून घेतलंय. तर आज खास रंगपंचमीच्या दिवशी मिलिंदला भेटण्यासाठी त्यांची पत्नी अंकिता पोहोचली होती. यावेळी होळीच्या निमित्ताने मिलिंदला रंगही लावला.

ADVERTISEMENT

मिलिंदने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि यात त्याच्यासोबत पीपीई किट घातलेली एक व्यक्तीही दिसतेय. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अंकिता आहे. मिलिंद त्याच्या पोस्टमध्ये म्हणतो, “क्वारंटाइनचा आजचा सातवा दिवस. अंकिता पीपीई किट आणि तोंडावर मास्क घालून मला भेटायला आली. आम्ही एकमेकांना मिठी मारू शकलो नाही. पण एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या.”

तो पुढे म्हणाला, “सीझनचा पहिला आंबा तसंच आईच्या हातची पुरणपोळीही खाल्ली. माझ्या तोंडाला चव नाहीये शिवाय वास येत नाही. पण ना डोकेदुखी आहे, ना ताप. या काळात सध्या मी माझ्या शरीराला आणि मनाला विश्रांती देतोय.”

हे वाचलं का?

तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेखला देखील कोरोनाची लागण झालीये. फातिमाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत ही माहिती दिलीये. “माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आलीये. त्यामुळे सध्या मी होम क्वारंटाइन आहे. मी स्वत:ची योग्य पद्धतीने काळजी घेत असल्याचं’ फातिमाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT