आता दादरच्या हिंदमाता भागात पाणी तुंबणार नाही, कारण…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुंबईत पावसाळ्यात काही प्रमाणात जरी मुसळधार पाऊस कोसळला तरी दादरमधील हिंदमाता या सखल परिसरात बऱ्याच प्रमाणात पाणी साचतं. त्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा होता. गेली अनेक वर्ष हिंदमाता परिसरात पावसाचं पाणी तुंबत असल्याचं पाहायला मिळत आलं आहे. मात्र, आता मुंबई महापालिकेने या समस्येवर कायमस्वरुपी उपाय शोधला आहे. ज्यासाठी या भागात काम देखील सुरु झालं असून त्याची पाहणी स्वत: पर्यावरण आणि पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

हिंदमाता परिसर खोल असल्यामुळे पावसाळ्यात त्याठिकाणी पाणी साचते. मुसळधार पाऊस झाल्यास या परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात तुंबते व त्याचा लवकर निचरा होत नाही. अशा वेळी या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेमार्फत या भूमिगत टाक्या बांधण्यात येत आहेत. या मोठ्या भूमिगत टाक्या पावसाळ्यामध्ये कमीतकमी 3 तास पावसाचे अतिरिक्त पाणी साठवून ठेवण्यास मदत करतील.

Mumbai Rains: मुंबईतील पावसाचा धडकी भरवणारा VIDEO, तौकताई चक्रीवादळाचा प्रकोप

हे वाचलं का?

जोरदार पर्जन्यवृष्टी तसेच हाय टाईडच्या कालावधीमध्ये याचा विशेष उपयोग होईल आणि त्यामुळे या ठिकाणी तुंबणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. मुंबईच्या ज्या ज्या भागामध्ये मुसळधार पावसात पाणी तुंबते अशा ठिकाणी यासारखे प्रकल्प उभे करता येतील, असे पालकमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

राजा कायम राहणार पण देशावर महामारी आणि आर्थिक संकट, वाचा काय आहे यंदाची भेंडवळची भविष्यवाणी

ADVERTISEMENT

या भूमीगत टाक्यांच्या वरच्या बाजूस अर्बन लँडस्केपिंग करुन त्या पूर्णपणे झाकल्या जाणार आहेत. जेणेकरुन तिथे कोणताही अपघात घडू नये. मुंबईतील ज्या भागात विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे पावसात पाणी साचते किंवा पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप वापरणे कठीण होते अशा ठिकाणी मुंबई महापालिकेने अशा आणखीन संभाव्य जागांसाठी शोध सुरू केला आहे.

ADVERTISEMENT

पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यासाठी उपाय म्हणून प्रमोद महाजन उद्यान, हिंदमाता फ्लायओव्हर, सेंट झेव्हियर्स ग्राऊंड येथे बांधण्यात येत असलेल्या भूमिगत टाक्यांच्या कामाची आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेविका उर्मिला पांचाळ, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त वेलारसू, हायड्रॉलिक इंजिनियरिंग विभागाचे अभियंते यावेळी उपस्थित होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT