केंद्रीय मंत्र्याने बेडसाठी केलेलं Tweet का आहे एवढं चर्चेत?
संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून अनेक रूग्णांना बेड मिळत नाहीयेत. दरम्यान अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्री जनरल वीके सिंग यांनी ट्विटरच्या माध्यमातून एका व्यक्तीला बेड हवा असल्याचं म्हटलंय. पहिल्यांदा अनेकांना वीके सिंग यांच्या भावाला कोरोनासाठी बेड हवा असल्याचं वाटलं. मात्र नंतर वीके सिंग यांनी भावासाठी नव्हे तर इतर कोणासाठी […]
ADVERTISEMENT
संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून अनेक रूग्णांना बेड मिळत नाहीयेत. दरम्यान अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्री जनरल वीके सिंग यांनी ट्विटरच्या माध्यमातून एका व्यक्तीला बेड हवा असल्याचं म्हटलंय. पहिल्यांदा अनेकांना वीके सिंग यांच्या भावाला कोरोनासाठी बेड हवा असल्याचं वाटलं. मात्र नंतर वीके सिंग यांनी भावासाठी नव्हे तर इतर कोणासाठी बेडची मागणी केली होती.
ADVERTISEMENT
वीके सिंह त्याच्या ट्विटमध्ये म्हणतात, “@dm_ghaziabad Please check this out प्लीज आमची मदत करा. माझ्या भावाला (भाई) कोरोनाच्या उपचारांसाठी बेडची आवश्यकता आहे. सध्या गाजियाबादमध्ये बेड उपलब्ध होऊ शकत नाही.”
हे वाचलं का?
वीके सिंह यांनी ट्विटमध्ये भाई शब्दचा वापर केल्याने अनेकजण गोंधळले. त्यांच्या या ट्विटनंतर अनेकांनी, मंत्री असून तुमची अशी परिस्थिती आहे. मग सामान्य माणसांची काय परिस्थिती होत असेल याचा विचार करा, असं म्हटलंय. या गोंधळानंतर वीके सिंह यांनी स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणाले, “तो माझ्या रक्ताच्या नात्याने भाऊ नसून मी मानवतेच्या दृष्टीकोनातून तसं म्हटलं.”
तर दिल्लीमध्ये कोरोनामुळे परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. दिल्लीमध्ये देखील कोरोना रूग्णांना बेड उपलब्ध होत नाहीयेत. यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. याद्वारे त्यांनी तातडीने ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT