चॅनल लागले की हे सुरु मग इतर वेळी….संजय राऊतांची नक्कल करत राज ठाकरेंनी उडवली खिल्ली
मनसे पक्षाचा १६ वा वर्धापन दिन गाजला तो पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणामुळे. पक्ष कार्यकर्त्यांना संबोधनाता राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांना हात घातला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानामुळे तयार झालेला वाद, निवडणुका, सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशा विषयांवर राज ठाकरेंनी भाष्य घेतलं. या भाषणादरम्यान राज ठाकरेंनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या बोलण्याची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली. […]
ADVERTISEMENT
मनसे पक्षाचा १६ वा वर्धापन दिन गाजला तो पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणामुळे. पक्ष कार्यकर्त्यांना संबोधनाता राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांना हात घातला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानामुळे तयार झालेला वाद, निवडणुका, सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशा विषयांवर राज ठाकरेंनी भाष्य घेतलं. या भाषणादरम्यान राज ठाकरेंनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या बोलण्याची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली.
ADVERTISEMENT
ईडी विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष राज्यात सध्या सुरु आहे. शिवसेनेकडून संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत ईडीच्या कार्यपद्धतीवर आरोप केले होते. प्रत्येक दिवशी सकाळी राऊत माध्यमांच्या प्रतिनिधींना आपली प्रतिक्रीया देतात. यावरुन राज ठाकरेंनी राऊतांवर निशाणा साधला.
हे संजय राऊत, किती बोलतात…काय बोलतात. सगळ्याची एक अॅक्शन असते. चॅनल लागले की हे सुरु चॅनल हटले की हे बंद असं म्हणत राज ठाकरेंनी संजय राऊतांच्या बोलण्याच्या शैलीची नक्कल केली, ज्याला उपस्थितीतांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. भविष्यातील महाराष्ट्राच्या पिढ्या हे पाहतायत, ते यातून काय शिकतील? असं म्हणत राज ठाकरेंनी सत्ताधारी विरुद्ध विरोधक वादावर आपलं मत मांडली.
हे वाचलं का?
…तुमचं अजुनही लग्न झालं नाही ! वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल राज ठाकरेंच्या रडारवर
राज ठाकरे पुढे म्हणाले की, “सत्ताधारी म्हणतात विरोधक आम्हाला संपवायला निघाले आहेत, विरोधी पक्ष म्हणतात सत्ताधारी आम्हाला संपवायला निघालेत. मग राहिलं कोण।? टीव्हीवर पाहिलं तर शिव्या सुरू आहेत, हेच राजकारण जर वरती सुरु असेल तर ग्रामपंचायतीमध्ये काय सुरू असेल. महाराष्ट्रातील लोक आता यांना वैतागले आहेत.” त्यामुळे त्यांना काही अडचणी आल्या तर ते सरकारकडे न जाता आपल्याकडे येतात हे आपलं यश आहे असं राज ठाकरे म्हणाले. या १६ वर्षात लोक आपल्याकडे विश्वासाने येतात, हीच माझी गेल्या १६ वर्षातली कमाई आहे असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना शाबासकी देताना, गेल्या लॉकडाऊनमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी जे काम केलं त्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत असं म्हणत राज यांनी त्यांचं कौतुक केलं.
ADVERTISEMENT
राज्यपाल म्हणजे कुडमुड्या ज्योतिषी ! पुण्यात राज ठाकरेंची तोफ धडाडली
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT