ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादिदींना जाहीर करावा मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार,मनसेची सरकारकडे आग्रही मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादिदी अर्थात सुलोचना लाटकर यांना केंद्र सरकारतर्फे देण्यात येणारा मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात यावा अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात येणार आहे. सुलोचनादिदींचं भारतीय सिनेमात अतुलनीय योगदान आहे. आणि त्यांच्या या योगदानाचा यथोचित सन्मान व्हावा यासाठी सुलोचनादिदींचा हा पुरस्कार देऊन गौरव व्हावा यासाठी मनसेने आता कंबर कसली आहे.

ADVERTISEMENT

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट लिहीत ही मागणी केली आहे. या पोस्टमध्ये अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे की प्रख्यात मराठी अभिनेत्री सुलोचना लाटकर म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या सुलोचनादीदी यांना केंद्र सरकारने मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरव करावा अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करत आहोत. याविषयीचं सविस्तर पत्रही माहिती प्रसारण खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांना देणार आहोत. गेली अनेक वर्ष सातत्याने ही मागणी जोर धरत असताना आता यावर्षी तरी सरकारने गांभीर्यपूर्वक या मागणीचा विचार करावा ही विनंती.

हे वाचलं का?

सुलोचनादिदींना दादासाहेब फाळके हा मानाचा पुरस्कार मिळावा यासाठी आधी बऱ्याचजणांनी प्रयत्न केले होते. तसेच सह्यांची मोहिमही राबवली होती. नुकतेच राष्ट्रीय फिल्म पुरस्कार जाहीर झाले. यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कारही जाहीर केला जातो. तो जाहीर होण्यापूर्वीच मनसेने आपली ही आग्रही मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT