मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन, केली महत्त्वाची मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला आहे. या फोनद्वारे त्यांनी MPSC च्या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी केली आहे. MPSC च्या विद्यार्थ्यांबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी याबाबत राज ठाकरेंना कोणतेही आश्वासन दिलेले नाही. मात्र चर्चा सकारात्मक झाली आहे असं समजतं आहे. MPSC ची पूर्व परीक्षा 11 एप्रिलला होणार आहे. मात्र वाढत्या कोरोना संसर्गामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंकडे केल्याचं समजतं आहे. मार्च महिन्यात परीक्षा आठ दिवसांनी पुढे ढकलली होती तेव्हा पुण्यात विद्यार्थ्यांनी ठाकरे सरकारविरोधात आंदोलन केलं होतं.

ADVERTISEMENT

‘या महिन्यातील सर्व परीक्षा पुढे ढकलाव्यात’, आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही अशीच मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे. सध्याची कोरोनाची स्थिती पाहता या महिन्यात होणाऱ्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्यांच्या पाठोपाठ आता राज ठाकरे यांनीही MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या अशी मागणी उद्धव ठाकरेंना फोनवरून केली आहे.

हे वाचलं का?

नागपूरमध्ये चिंताजनक परिस्थिती, गेल्या 24 तासात ‘एवढ्या’ कोरोना रुग्णांचा मृत्यू

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता परीक्षेच्या ठिकाणी कोव्हिड विषाणूची लागण विद्यार्थ्यांना होऊ शकते. पुण्यात काही दिवसांपूर्वी याच परीक्षेची तयारी करत असणाऱ्या वैभव शितोळे या तरूणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांकडूनही ही मागणी होते आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं समजतं आहे मात्र कुठलाही निर्णय अद्याप समोर आलेला नाही.

ADVERTISEMENT

प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केलं असंत तर आज कोरोना लस कमी पडली नसती: उदयनराजे भोसले

ADVERTISEMENT

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाचे ५० हजारांहून जास्त रूग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. गुरूवारी राज्यात 56 हजारपेक्षा जास्त रूगणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी समोर आली होती. तर गुरूवारच्या दिवसभरात 376 मृत्यूंची नोंद झाली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT