दारु अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला
अवैधरित्या हातभट्टी चालवणाऱ्या दारुअड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाने हल्ला गेल्याची गंभीर घटना घडली आहे. माळशिरस तालुक्यातील वेळापूर गावात हा प्रकार घडला असून जमावाने केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वेळापूर गावात अवैधरित्या दारुचा अड्डा चालवत जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. परंतू कारवाईला पोहचलेल्या पथकावर स्थानिक जमावाने […]
ADVERTISEMENT
अवैधरित्या हातभट्टी चालवणाऱ्या दारुअड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाने हल्ला गेल्याची गंभीर घटना घडली आहे. माळशिरस तालुक्यातील वेळापूर गावात हा प्रकार घडला असून जमावाने केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ADVERTISEMENT
वेळापूर गावात अवैधरित्या दारुचा अड्डा चालवत जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. परंतू कारवाईला पोहचलेल्या पथकावर स्थानिक जमावाने जोरदार हल्ला चढवला आणि घटनास्थळावर चांगलाच गदारोळ झाला. ३०-४० जणांचा जमाव पोलीस पथकावर चालून आल्याने त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं पोलीसांना जमलं नाही.
जमावाने केलेल्या या हल्ल्यात पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे आणि पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल बंदुके हे कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलीस नाईक महेरकर यांनाही या हल्ल्यात किरकोळ दुखापत झाली आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु असून पोलीस या प्रकरणी हल्लेखोरांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT