मोदीजी टाळ्या वाजवणं, थाळ्या बडवणं पुरे झालं.. आता देशाला लसीकरणाची गरज-राहुल गांधी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

385 दिवसांमध्ये कोरोनाची लढाई जिंकता आली नाही. टाळ्या वाजवणं, थाळ्या बडवणं पुष्कळ झालं आता देशाला व्हॅक्सिनची म्हणजेच लसीची गरज आहे असं खोचक ट्विट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच राहुल गांधी यांनी टोला लगावला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन 385 दिवस झाले आहेत तरीही कोरोनाविरोधातलं युद्ध जिंकता आलेलं नाही. उत्सव, टाळ्या, थाळ्या वाजवणं आता खूप झालं. आता लोकांना गरज आहे व्हॅक्सिनची..

ADVERTISEMENT

सरकारच्या धोरणांमुळे देशातील प्रत्येक वर्ग त्रस्त झाला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढतोच आहे, तर दुसरीकडे लसींची कमतरता जाणवते आहे. शेतकरी, मजूर संकटात आहेत. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. छोटे उद्योग-धंदे बंद होत आहेत. मध्यमवर्गही त्रस्त झाला आहे असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.

तुम्ही लोकांकडून थाळ्या वाजवून घेतल्या, घंटा बडवून घेतल्या, मोबाईलचे लाईट पेटवायला सांगितले तरीही कोरोना थांबला नाही. आता देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनामुळे लोकांचे मृत्यू होत आहेत. आता देशाला कोरोना प्रतिबंधक लसीची गरज आहे. ती ज्या लोकांना हवी आहे, त्यांना लवकर उपलब्ध करून द्या. इव्हेंटबाजी आता पुरे झाली असं म्हणत राहुल गांधींनी मोदींना खडे बोल सुनावले आहेत.

हे वाचलं का?

ती कोव्हिड व्हॅक्सिन नव्हे, मोदी व्हॅक्सिन! ममता बॅनर्जींचा टोला

पी. चिदंबरम यांनीही मोदी सरकारवर टीका केली आहे. केंद्रातील सरकार कधी लसीकरण मोहिमेला उत्सव म्हणते तर कधी दुसरं युद्ध आहे असं सांगितलं जातं. नेमकं काय आहे? असाही प्रश्न चिदंबरम यांनीही विचारला आहे. मोदींनी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली तेव्हा 21 दिवसात ही लढाई जिंकू असा विश्वास व्यक्त केला होता. पोकळ दावे, वायफळ बडबड आणि मोठमोठ्या गप्पा झोडल्याने कोरोना संसर्गाच्या विरोधात यश मिळणार नाही. आपलं अपयश लपवण्यासाठीच सरकार व्हॅक्सिनचा पुरवठा आणि वितरण नियोजन व्यवस्थित करत नसल्याचाही आरोप काँग्रेसने केला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT