महाराष्ट्रात दिवसभरात 14 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 198 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात 14 हजार 347 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 56 लाख 99 हजार 983 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 95.73 टक्के इतका झाला आहे. आज महाराष्ट्रात 9 हजार 798 नवीन रूग्णांचे निदान झालं. तर राज्यात 198 मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.96 टक्के इतका झाला आहे.

ADVERTISEMENT

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 90 लाख 78 हजार 541 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59 लाख 54 हजार 508 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8 लाख 54 हजार 461 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 4 हजार 831 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 1 लाख 34 हजार 747 सक्रिय रूग्ण आहेत.

महाराष्ट्रातले कोरोना मृत्यू लपवले जाताहेत का?

हे वाचलं का?

आज राज्यात 9,798 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 59,54,508 झाली आहे.आज नोंद झालेल्या एकूण 198 मृत्यूंपैकी 133 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 65 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 450 ने वाढली आहे. हे 450 मृत्यू, नाशिक-122, अहमदनगर-111, पुणे-57, नागपूर-49, जळगाव-20, ठाणे-17, भंडारा-16, उस्मानाबाद-11, सातारा-9, यवतमाळ-5, अकोला-4, औरंगाबाद-4, धुळे-4, बीड-3, बुलढाणा-3, चंद्रपूर-3, सांगली-3, लातूर-2, वर्धा-2, हिंगोली-1, रत्नागिरी-1, सिंधुदुर्ग-1, सोलापूर-1 आणि वाशिम-1 असे आहेत.

10 हजारांपेक्षा जास्त सक्रिय रूग्णसंख्या असलेलेल महाराष्ट्रातले जिल्हे

ADVERTISEMENT

मुंबई- 18 हजार 764

ADVERTISEMENT

ठाणे- 13 हजार 970

पुणे- 17 हजार 888

सांगली- 10 हजार 545

कोल्हापूर- 11 हजार 453

महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या सक्रिय रूग्णांची संख्या 10 हजारांपेक्षा जास्त आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT