चिंताजनक ! राज्यात एकाच दिवशी कोरोनाचे १६ हजार रुग्ण
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत आहे. सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रात १५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. रविवारी हा आकडा आणखी वाढून १६ हजार ६२० इतका झाल्यामुळे सरकारी यंत्रणांसमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. आज राज्यात ५० रुग्णांनी कोरोनाशी लढताना आपले प्राण गमावले असून राज्याचा मृत्यूदर हा २.२८ टक्के इतका झाला […]
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत आहे. सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रात १५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. रविवारी हा आकडा आणखी वाढून १६ हजार ६२० इतका झाल्यामुळे सरकारी यंत्रणांसमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. आज राज्यात ५० रुग्णांनी कोरोनाशी लढताना आपले प्राण गमावले असून राज्याचा मृत्यूदर हा २.२८ टक्के इतका झाला आहे.
ADVERTISEMENT
सध्याच्या घडीला राज्यात १ लाख २६ हजार २३१ कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. ज्यात पुणे जिल्हा सर्वात आघाडीवर असून नागपूर जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे. पुणे जिल्ह्यात सध्याच्या घडीला २५ हजार ६७३ तर नागपुरात १६ हजार ९६४ सक्रीय रुग्ण आहेत. दुसरीकडे मुंबईत आज १९६२ रुग्ण सापडले असून ७ रुग्णांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.
राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेला कोरोना विषाणूचा संसर्ग राज्य सरकारसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावधीपासून पुन्हा एकदा रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता अनेक महत्वाच्या भागात सरकारने लॉकडाउन जाहीर केलं असून काही भागांत संचारबंदी जाहीर केली आहे. राज्यातील हॉटेलचालकांनाही राज्य सरकारने निर्बंध घालून दिले आहेत. सोशल डिस्टन्सिंग, ५० टक्के क्षमतेने हॉटेल व रेस्टॉरंट चालवणं, स्वच्छता बाळगणं असे नियं सर्वांना बंधनकारक करण्यात आले आहेत.
हे वाचलं का?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्सचे प्रतिनिधी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत सहकार्य करण्याचं आवाहन केलं. लॉकडाउन करुन सगळं बंद करणं आम्हालाही नकोय…परंतू कडक निर्बंध लावण्याची वेळ आणू नका अशा शब्दांमध्ये ठाकरेंनी हॉटेलमालकांना इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT