महाराष्ट्रात 4 हजारांहून जास्त Corona रूग्ण पॉझिटिव्ह, 55 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात 4219 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत तर 55 रूग्णांचा मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्याचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात 2538 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण 62 लाख 95 हजार 236 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के इतके […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात 4219 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत तर 55 रूग्णांचा मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्याचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात 2538 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण 62 लाख 95 हजार 236 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के इतके झाले आहेत.
ADVERTISEMENT
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 55 लाख 19 हजार 679 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 87 हजार 25 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 92 हजार 510 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 1911 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
राज्यात आज घडीला 50 हजार 229 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 4219 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे त्यामुळे राज्यातील एकूण रूग्णांची संख्या 64 लाख 87 हजार 25 इतकी झाली आहे. आज राज्यातील कोविड बाधित रुग्णांचे रिकाँसिलिएशन करण्यात आले आहे. दुहेरी नोंद असलेले रुग्ण वगळल्यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्येत 15066 ने घट झाली आहे तर डिस्चार्ज झालेल्या रुग्णाची संख्या देखील 15,793 ने कमी झाली आहे.
हे वाचलं का?
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोव्हिड 19 बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो असंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे.
मुंबईत 458 नवे रूग्ण
ADVERTISEMENT
मुंबईत दिवसभरात 458 नवे रूग्ण आढळले आहेत. तर 334 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आत्तापर्यंत 7 लाख 25 हजार 581 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत सध्या 4010 सक्रिय रूग्ण आहेत.
ADVERTISEMENT
पुण्यात 213 नवे रूग्ण
पुण्यात 213 नवे रूग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 123 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरात आत्तापर्यंत 4 लाख 86 हजार 421 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पुण्यात आज दिवसभरात 3 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT