महाराष्ट्रात दिवसभरात 51 हजारांपेक्षा जास्त कोरोना रूग्णांची नोंद, 258 मृत्यू
महाराष्ट्रात दिवसभरात 51 हजार 751 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात 258 मृत्यूंची नोंद दिवसभरात झाली आहे. दिवसभरात 52 हजार 312 रूग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 28 लाख 34 हजार 473 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात राज्याचा रिकव्हरी रेट 81.94 टक्के इतका झाला आहे. राज्यातला मृत्यू […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात दिवसभरात 51 हजार 751 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात 258 मृत्यूंची नोंद दिवसभरात झाली आहे. दिवसभरात 52 हजार 312 रूग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 28 लाख 34 हजार 473 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात राज्याचा रिकव्हरी रेट 81.94 टक्के इतका झाला आहे. राज्यातला मृत्यू दर हा सध्या 1.68 टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 23 लाख 22 हजार 393 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 34 लाख 58 हजार 996 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
ADVERTISEMENT
पुढच्या पंधरा दिवसात आरोग्यसेवांवर सर्वाधिक ताण पडण्याची चिन्हं- अजित पवार
सध्या राज्यात 32 लाख 75 हजार 224 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 29 हजार 399 संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज घडीला राज्यात 5 लाख 64 हजार 746 अॅक्टिव्ह केसेस आहेत.
हे वाचलं का?
महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हे आणि त्यातील अॅक्टिव्ह रूग्ण
मुंबई- 89 हजार 125
ADVERTISEMENT
ठाणे-75 हजार 683
ADVERTISEMENT
पुणे- 1 लाख 10 हजार
सातारा-7 हजार 837
नाशिक-37 हजार 760
अहमदनगर- 13 हजार 107
औरंगाबाद- 15 हजार 542
नागपूर- 59 हजार 756
अॅक्टिव्ह रूग्णसंख्येची प्रमुख जिल्ह्यांमधली संख्या पाहिली की लक्षात येतं की सर्वाधिक सक्रिय रूग्ण पुण्यात आहेत. पुण्यात 1 लाखांपेक्षा जास्त आहेत. तर मुंबईत 89 हजारांपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण आहेत. त्या खालोखाल ठाण्यात 75 हजारांपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण आहेत.
महाराष्ट्रात Lockdown शिवाय आता पर्याय नाही, टास्क फोर्सचंही हेच मत -राजेश टोपे
राज्यात दिवसभरात 51 हजार 751 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता 34 लाख 58 हजार 996 इतकी झाली आहे. आज महाराष्ट्रात 258 कोरोना रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी 169 मृत्यू हे मागील 48 तासांमधले आहेत. तर 59 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. तर 30 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीतले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT