महाराष्ट्रात दिवसभरात 66 हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह तर 773 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात 66 हजार 836 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 773 मृत्यूंची नोंद झाली आहे. या सगळ्यात समाधानाची बाब ही आहे की 74 हजार 45 रूग्ण दिवसभरात कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 34 लाख 4 हजार 792 रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर राज्यात आत्तापर्यंत एकूण 41 लाख 61 हजार 676 रूग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण 63 हजार 252 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्राला Oxygen, Remdesivir आणि लसींचा पुरवठा वाढवा, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

महाराष्ट्रात आत्तापर्यंत 2 कोटी 51 लाख 73 हजार 596 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 41 लाख 61 हजार 676 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज घडीला 41 लाख 88 हजार 266 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 29 हजार 378 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज घडीला राज्यात 6 लाख 91 हजार 851 रूग्ण सक्रिय आहेत. महाराष्ट्रात दिवसभरात 74 हजार 45 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 81.81 टक्के इतका झाला आहे. तर राज्यातील मृत्यू दर 1.52 टक्के इतका झाला आहे.

हे वाचलं का?

Lockdown: दोन तासात लग्न आटपा नाहीतर 50 हजारांचा दंड, 22 तारखेपासून नवे निर्बंध

महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हे आणि अॅक्टिव्ह रूग्णसंख्या

ADVERTISEMENT

मुंबई – 81 हजार 174

ADVERTISEMENT

ठाणे- 77 हजार 793

पालघर- 14 हजार 720

रायगड- 14 हजार 21

पुणे- 1 लाख 16 हजार 602

सातारा- 14 हजार 974

सोलापूर -14 हजार 889

नाशिक- 43 हजार 848

अहमदनगर- 20 हजार 937

जळगाव – 14 हजार 36

औरंगाबाद- 13 हजार 581

बीड- 11 हजार 146

लातूर- 18 हजार 55

नांदेड- 11 हजार 585

नागपूर- 80 हजार 862

भंडारा-12 हजार 959

गोंदिया- 11 हजार 223

चंद्रपूर-19 हजार 814

महाराष्ट्रातील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या लक्षात घेतली तर सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण पुण्यात आहेत. 1 लाख 16 हजारांपेक्षा जास्त रूग्ण पुण्यात आहेत. तर त्यानंतर मुंबई आणि नागपुरातही अॅक्टिव्ह रूग्णसंख्या जास्त आहे. ठाण्यातही 77 हजारांच्या वर अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT