Mumbai : दुसऱ्या वर्षांपासून ‘ती’ खायची केस; ऑपरेशननंतर डॉक्टरांनाही बसला धक्का

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मिथिलेश गुप्ता, कल्याण

ADVERTISEMENT

कल्याणमध्ये (Kalyan) एका 12 वर्षीय मुलीवर शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून तब्बल 650 ग्रॅम केसांचा (Hair) गोळा काढण्यात आल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. 12 वर्षीय मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया (Operation) करुन डॉक्टरांनी केसाचा मोठा गोळा मुलीच्या पोटातून बाहेर काढला आहे. ज्यामुळे मुलीचा जीव बचावला आहे.

मुलीच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मुलीला वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच केस खाण्याची सवय लागली होती. या सवयीला ट्रायकोफेगिया असे म्हणतात. या मुलीच्या पालकांनी तिची ही सवय सुटावी म्हणून खूप प्रयत्न केले होते. परंतु ती सवय सुटली नाही. गेल्या आठवड्यात अचानक मुलीच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

हे वाचलं का?

ज्यावेळी तिला रुग्णालयात आणलं गेलं तेव्हा तिचे वजन फक्त 20 किलो एवढंच होतं. सिटीस्कॅन केल्यानंतर तिच्या आतड्यात पूर्णपणे केस अडकले असल्याचे दिसून आले. मागील गेल्या दोन महिन्यापासून तिला जेवण देखील जात नव्हतं. अखेर हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

पोटावरील गंभीर शस्त्रक्रिया करण्यासाठी लॅप्रोस्कॉपीक पद्धतीचा अवलंब केला जातो. परंतु केसांचा गोळा एवढा मोठा होता की हा गोळा काढताना केस लॅप्रोस्कॉपीक मशीनमध्ये अडकण्याची भीती होती. म्हणूनच ओपन सर्जरीचा मार्ग निवडला गेला आणि भला मोठा केसाचा गोळा मुलीच्या पोटातून काढण्यात डॉक्टरांना यश मिळालं.

ADVERTISEMENT

बिग बी यांच्यावर झाली शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेनंतर म्हणाले…

ADVERTISEMENT

दरम्यान, या शस्त्रक्रियेनंतर मुलीला जेवताना पाहून तिच्या पालकांना देखील प्रचंड आनंद झाला. या केसाच्या गोळ्याला वैद्यकीय भाषेत ट्रायकोबिझोअर म्हणतात. या दुर्मिळ प्रकारात केस खाल्ल्यामुळे पोटात केसाचा गोळा तयार होतो.

या केसांमुळे पोटाला ईजा होऊन पूदेखील तयार होतो. जसजसा या गोळ्याचा आकार वाढायला लागतो तसतशी पोटदुखी सुरु होते. अनेकवेळा योग्य निदान झाले नाही तर ती व्यक्ती बेशुद्ध पडू शकते आणि तिच्या जीवावर देखील बेतू शकतं. मात्र, यावेळी डॉक्टरांनी आपला संपूर्ण अनुभव पणाला लावून मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया केली.

आतापर्यंत अनेकदा डॉक्टरांनी पोटातून मोठमोठे ट्यूमर किंवा वस्तू ऑपरेशनद्वारे काढल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र, पहिल्यांदा पोटातून केस आणि ते देखील अर्धा किलोहून अधिक काढल्याची घटना फारच दुर्मिळ असल्याचं बोललं जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT