राज्यात ६ कोटींहून अधिक जनतेला लसीचे दोन डोस, चार जिल्ह्यांमध्ये प्रमाण ५० टक्क्यांखाली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत असताना राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या नवीन आकडेवारीनुसार, राज्यातील ६६ टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. राज्यात आतापर्यंत ६ कोटी ८७ लाख ९ हजार २६७ लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.

ADVERTISEMENT

राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये ६६ टक्क्यांहून अधिक लोकांचं लसीकरण पूर्ण झालं असून १८ जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण ५० ते ६६ टक्क्यांच्या मध्ये आहे. ४ जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे.

औरंगाबाद, अकोला, बीड आणि नंदूरबार या चार जिल्ह्यांमध्ये सध्याच्या घडीला लसीकरणाचं प्रमाण हे ५० टक्क्यांहून कमी आहे. या जिल्ह्यांत सरासरी ४५ ते ४७ टक्के लसीकरण झाले आहे. औरंगाबादमध्ये ४७.४८ टक्के, अकोल्यामध्ये ४७.०३ टक्के, बीडमध्ये ४७.४८ टक्के, तर नंदूरबार ४५.२७ टक्के एवढेच लसीकरण झाले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली असून येथील लसीकरण वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. सध्या ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली असल्यामुळे भविष्यात परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून लोकांनी लवकरात लवकर लसीचे डोस घ्यावेत ही विनंती सरकारी यंत्रणा करत आहेत.

हे वाचलं का?

याउलट ६६ टक्क्यांहून अधिक लसीकरण झालेल्या जिल्ह्यांत मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांसह भंडारा, चंद्रपूर, सांगली, सातारा, गोंदिया, रायगड, वर्धा, रत्नागिरीसारखे १३ जिल्हे आहेत. १३ जिल्ह्यातील मुंबई, पुणे आणि भंडारा या तीन जिल्ह्यांत १०० टक्के पहिला डोस पूर्ण झाला असून उर्वरित दहा जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण ९४ ते ९९ टक्क्यांच्या दरम्यान आहे.

राज्याच्या सरासरी दोन्ही लसीकरणाच्या ६६ टक्क्यांहून कमी असलेल्या १८ जिल्ह्यांत ७३ ते ४५ टक्के एवढे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, मुंबईतील ९३.८७ टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT