Shocking : नाशिकमध्ये अभ्यास न करणाऱ्या मुलाचा खून करून आईने केली आत्महत्या
अभ्यास करत नाही म्हणून मुलाचा खून करून आईने स्वतःचं आयुष्य संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. तीन वर्षांच्या चिमुकल्याला ठार करून त्याच्या आईने आत्महत्या केली आहे. नाशिकच्या पाथर्डी फाटा भागात ही घटना घडली आहे. रिधान सागर पाठक असं हत्या झालेल्या तीन वर्षीय मुलाचं नाव आहे. तर शिखा सागर पाठक असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. इंदिरा […]
ADVERTISEMENT
अभ्यास करत नाही म्हणून मुलाचा खून करून आईने स्वतःचं आयुष्य संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. तीन वर्षांच्या चिमुकल्याला ठार करून त्याच्या आईने आत्महत्या केली आहे. नाशिकच्या पाथर्डी फाटा भागात ही घटना घडली आहे. रिधान सागर पाठक असं हत्या झालेल्या तीन वर्षीय मुलाचं नाव आहे. तर शिखा सागर पाठक असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. इंदिरा नगर पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. पाथर्डी फाटा भागात असलेल्या साईसिद्धी अपार्टमेंटमध्ये पाठक कुटुंबीय राहतात.
ADVERTISEMENT
मृतदेहाजवळ शिखा यांची चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये सर्वच निर्णय मी स्वखुशीने घेते आहे, त्यात कोणाचीही चूक नाही असे लिहले होते.या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात रिधान अभ्यास करत नसल्याचा शिखा यांना राग येत होता व त्यामुळे त्यांची चिडचिड होत होती. त्यातूनच त्यांनी मुलाचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
सोमवारी शिखा यांनी बेडरुमचा दरवाजा लावून घेतला. बराच वेळ झाला तरी प्रतिसाद न मिळाल्याने सुरेश गंगाराम पाठक यांनी मुलास बोलवून घेत बेडरुमचा दरवाजा तोडला. त्यावेळी शिखा या गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला, तर रिधानच्या नाकातून रक्त येत होते. त्यामुळे कुटुंबियांनी रिधानला दवाखान्यात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रिधानला नेमकं कसं ठार केलं ते समजू शकलेलं नाही. रिधानला ठार केल्यानंतर शिखा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT