Independence Day Celebration 2021: गोल्डमेडल विजेत्या Neeraj Chopra ला मुंबईकर तरुणाच्या विशेष कलाकृतीतून शुभेच्छा

मुंबई तक

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भालाफेकीत सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या नीरज चोप्रावर सध्या सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. देशात स्वातंत्र्य दिनचा उत्साह असताना मुंबईतल्या तरुणाने एका विशेष कालकृतीतून निरज चोप्राला शुभेच्छा दिल्या आहेत. नीरज चोप्रावर सध्या देशभरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. मुंबईतला मोझ्यक आर्टीस्ट चेतन राऊतने २१ हजार पुश पिन्सच्या माध्यमातून ४ फुट लांब आणि […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भालाफेकीत सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या नीरज चोप्रावर सध्या सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. देशात स्वातंत्र्य दिनचा उत्साह असताना मुंबईतल्या तरुणाने एका विशेष कालकृतीतून निरज चोप्राला शुभेच्छा दिल्या आहेत.

नीरज चोप्रावर सध्या देशभरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. मुंबईतला मोझ्यक आर्टीस्ट चेतन राऊतने २१ हजार पुश पिन्सच्या माध्यमातून ४ फुट लांब आणि ४ फुट रुंदीचे नीरज चोप्राचे मोझ्येक पोर्ट्रेट तयार केलं आहे.

चेतन राऊत हा कलाकारा गेली अनेक वर्ष मोझ्यक आर्टच्या माध्यमातून अनेक नामवंत लोकांची पोर्ट्रेट तयार करतो. नीरज चोप्राचं पोर्ट्रेट तयार करण्यासाठी चेतनला १२ तासांचा अवधी लागला. २१ हजार पुश पिन्सच्या सहाय्याने आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत चेतन राऊतने नीरज चोप्राची ही सुंदर कलाकृती साकारली आहे.