नवनीत राणांच्या अडचणी संजय राऊतांनी वाढवल्या?, शोधलं डी-गँग कनेक्शन
मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या अडचणींमध्ये संजय राऊत यांनी भर घातली आहे. मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठनाच्या वादातून चर्चेत असलेल्या नवनीत राणांचं डी गँगशी असलेलं कनेक्शन संजय राऊत यांनी समोर आणलं आहे. नवनीत राणा यांच्या निवडणुक प्रतिज्ञापत्रातील एक छोटा भाग आपल्या ट्विटर अकाऊंटवर संजय राऊतांनी पोस्ट केला आहे. ज्यात नवनीत राणा […]
ADVERTISEMENT
मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या अडचणींमध्ये संजय राऊत यांनी भर घातली आहे. मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठनाच्या वादातून चर्चेत असलेल्या नवनीत राणांचं डी गँगशी असलेलं कनेक्शन संजय राऊत यांनी समोर आणलं आहे.
ADVERTISEMENT
नवनीत राणा यांच्या निवडणुक प्रतिज्ञापत्रातील एक छोटा भाग आपल्या ट्विटर अकाऊंटवर संजय राऊतांनी पोस्ट केला आहे. ज्यात नवनीत राणा यांच्या राणा एज्युकेशन सोसायटीला युसूफ लकडावाला या व्यक्तीने 80 लाखांचं कर्ज दिल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
नवनीत राणा ने युसुफ लकड़ावाला से ₹80 लाख का लोन लिया था,जिनकी जेल में मौत हो गई थी।उसी लकड़ावाला को @dir_ed ने मनी लॉन्ड्रिंग मामले में गिरफ्तार किया था व उसके डी गैंग से संबंध भी थे।
मेरा सवाल-क्या ED ने इसकी जांच की ? राष्ट्रीय सुरक्षा का मामला है! @KiritSomaiya @sanjayp_1 pic.twitter.com/u0h8cmT0He— Sanjay Raut (@rautsanjay61) April 26, 2022
युसूफ लकडावाला याला काही दिवसांपूर्वी ईडीने मनी लाँड्रींग प्रकरणात अटक केली होती, ज्यात कारागृहातच त्याचा मृत्यू झाला. युसूफ लकडावालाचे डी गँगशी संबंध असून ईडीने या प्रकरणाची चौकशी केली आहे का? हा देखील राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
Navneet Rana : नवनीत राणांचा गंभीर आरोप; मुंबई पोलीस आयुक्तांनी ‘व्हिडीओ’च दाखवला
केंद्रीय तपासयंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर होत असलेली कारवाई हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा मुद्दा ठरत होता. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी ईडीने दाऊद गँगशी संबंधित व्यक्तींसोबत केलेल्या व्यवहारावरुन अटक केली आहे. नवाब मलिकांच्या अटकेनंतर विरोधी पक्षातील भाजपने राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पुढे करत नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे हाच राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणत संजय राऊतांनी आधीच अटकेत असलेल्या नवनीत राणांच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
ADVERTISEMENT
राणांविरुद्धचं ‘ते’ वक्तव्य राऊतांना भोवणार? युवा स्वाभिमानीची नागपूर पोलिसांत तक्रार दाखल
ADVERTISEMENT
दरम्यान, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आज जामीनासाठी सत्र न्यायालयाचं दार ठोठावलं होतं. परंतू सत्र न्यायालयानंही सरकारी वकीलांना याप्रकरणी तीन दिवसांची वेळ देत जामीनावरील सुनावणी २९ एप्रिल रोजी केली जाईल असं म्हटलं आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला २९ एप्रिलपर्यंत तुरुंगातच राहावं लागणार असल्याचं निश्चित झालं आहे.
“त्या कारमध्ये सोमय्या काय मोदी असते तरीही ती फोडली असती”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT