अंगडीया खंडणी प्रकरण : DCP सौरभ त्रिपाठींच्या साथीदाराला लखनऊमधून अटक
– देव कोटक, मुंबई प्रतिनिधी सध्या मुंबई शहरात गाजत असलेल्या अंगडीया खंडणी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने DCP सौरभ त्रिपाठी यांच्या साथीदाराला लखनऊमधून अटक केली आहे. खंडणी प्रकरणात त्रिपाठी यांचं नाव समोर आल्यानंतर जवळपास महिनाभरापासून ते गायब आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनऊमधून अटक केलेला व्यक्ती हा सौरभ त्रिपाठी यांच्यासाठी हवालाच्या पैशांची देवाण-घेवाण पहायचा. मुंबई पोलिसांनी […]
ADVERTISEMENT
– देव कोटक, मुंबई प्रतिनिधी
ADVERTISEMENT
सध्या मुंबई शहरात गाजत असलेल्या अंगडीया खंडणी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने DCP सौरभ त्रिपाठी यांच्या साथीदाराला लखनऊमधून अटक केली आहे. खंडणी प्रकरणात त्रिपाठी यांचं नाव समोर आल्यानंतर जवळपास महिनाभरापासून ते गायब आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनऊमधून अटक केलेला व्यक्ती हा सौरभ त्रिपाठी यांच्यासाठी हवालाच्या पैशांची देवाण-घेवाण पहायचा. मुंबई पोलिसांनी या व्यक्तीला अटक करुन कोर्टासमोर हजर केलं आहे. अद्याप या व्यक्तीचं नाव पोलिसांनी जाहीर केलेलं नाही. मुंबईतील अंगडीयांकडून मिळालेला पैसा डीसीपी त्रिपाठी हवालाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशला पाठवायचे अशी माहिती पोलिसांनी दिली.
हे वाचलं का?
याव्यतिरीक्त मुंबई पोलिसांनी डीसीपी त्रिपाठी यांच्या लखनऊ येथील घरात काम करणाऱ्या नोकरालाही या प्रकरणात अटक केली आहे. पप्पूकुमार प्यारेलाल असं या नोकराचं नाव असून त्रिपाठी हवालामार्फत पाठवत असलेले पैसे पप्पूपर्यंत पोहचायचे असं पोलिसांना समजलं. मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान त्यांना पप्पूकडे दीड लाखांची रक्कम सापडून आली.
काय आहे अंगडीया प्रकरण?
ADVERTISEMENT
रोख रक्कम, सोनं-चांदी यासह हिरे आदी गोष्टी एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणाऱ्या मुंबईतील अंगडिया असोसिएशनने मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पोलीस अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी करत त्रास दिला जात असल्याची तक्रार केली होती. खंडणी मागितली जात असल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर दक्षिण मुंबई विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी १८ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला होता. सुरुवातीला एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल गेला होता.
ADVERTISEMENT
त्रिपाठी कसे अडकले?
या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांवर अटक करण्यात आली. यात पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांच्यासह पोलीस अधिकारी नितीन कदम आणि समाधान जमदाडे यांचा समावेश आहे. दरम्यान, या खंडणीच्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा विभागाकडे देण्यात आला. पोलीस तपासातून पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचं नावं समोर आलं.
सौरभ त्रिपाठी यांचं नाव समोर आल्यानंतर त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यातून हटवण्यात आलं. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून सौरभ त्रिपाठी फरार आहेत. या खंडणीप्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
संजय पांडे यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार घेण्याच्या आधीपासूनच सौरभ त्रिपाठी सुट्टीवर आहेत. ओम वंगाटे यांना कोठडी वाढवून घेण्यासाठी न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्याचवेळी पोलिसांनी आपल्या अर्जात पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना फरार घोषित केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT