सुप्रीम कोर्टाच्या ‘टास्क फोर्स’मध्ये निवड झालेले डॉ. राहुल पंडित आहेत तरी कोण?
देशात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे देशात ऑक्सिजनचा तुटवडा भासतो आहे. महत्त्वाच्या आणि कोरोनावर उपयुक्त ठरणाऱ्या अशा औषधांचा तुटवडा भासतो आहे. यावरून सुप्रीम कोर्टामध्ये काही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. अशात आता सुप्रीम कोर्टाने एका बारा सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या टास्क फोर्समध्ये मुंबईतील दोन डॉक्टरांचा समावेश आहे. सुप्रीम कोर्टाच्या नॅशनल […]
ADVERTISEMENT
देशात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे देशात ऑक्सिजनचा तुटवडा भासतो आहे. महत्त्वाच्या आणि कोरोनावर उपयुक्त ठरणाऱ्या अशा औषधांचा तुटवडा भासतो आहे. यावरून सुप्रीम कोर्टामध्ये काही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. अशात आता सुप्रीम कोर्टाने एका बारा सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या टास्क फोर्समध्ये मुंबईतील दोन डॉक्टरांचा समावेश आहे. सुप्रीम कोर्टाच्या नॅशनल टास्क फोर्समध्ये मुंबईतील दोन डॉक्टरांचा समावेश होणं ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.
ADVERTISEMENT
‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोग जबाबदार’, कोर्ट प्रचंड संतापलं!
हा नॅशनल टास्क फोर्स ऑक्सिजन आणि औषधांची उपलब्धता, वितरण याबाबत मार्गदर्शक सूचना देण्याचं महत्त्वाचं काम करणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वात मोठा फटका हा आपल्या देशाला बसला आहे त्यातही महाराष्ट्राची अवस्था बिकट आहे, गेल्या काही दिवसांमध्ये वाढणारे रूग्ण आणि होणारे मृत्यू हीच चिंताजनक परिस्थिती दर्शवत आहेत. अशात आता नॅशनल टास्क फोर्समध्ये मुंबईच्या दोन डॉक्टरांचा समावेश झाला आहे. डॉ. राहुल पंडित आणि झरीर एफ उदवाडिया. डॉ. झरीर हे हिंदुजा आणि ब्रीच कँडी रूग्णालयात श्वसन विकार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
हे वाचलं का?
Corona virus : सुप्रीम कोर्टाने केली 12 सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना
आता आपण जाणून घेऊ की कोण आहेत डॉ. राहुल पंडित?
ADVERTISEMENT
डॉ. राहुल पंडित हे मुंबईतील मुलुंडच्या फोर्टिस या रूग्णालयात क्रिटिकल केअर मेडिसिन विभागाचे संचालक म्हणून काम करतात. अति दक्षता विभागातील रूग्णांवर उपचार करण्यात त्यांनी विशेष कौशल्य प्राप्त केलं आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच ते कोरोना रूग्णांवर उपचार करत आहेत. या आजारावरील उपचार पद्धती विकसित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. अतिदक्षता विभागातील कामकाजाविषयी त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन शिक्षण घेतलं आहे. रूग्णालयांमधील अतिदक्षता कसे असावेत याबद्दल त्यांनी तयार केलेल्या गाईडलाईन्स या आजही आदर्श मानल्या जातात.
ADVERTISEMENT
ICU अर्थात अतिदक्षता विभागाची नेमकी संकल्पना काय? या विभागाने सातत्याने कोणते नियम पाळले पाहिजेत? रूग्णाच्या काळजीचे कोणते आयाम पाळले पाहिजेत? या सगळ्या प्रश्नांवर डॉ. राहुल पंडित यांचा विशेष अभ्यास आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्राने जी कोरोना रूग्णांसाठी जो डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला आहे त्याचेही डॉक्टर राहुल पंडित हे सदस्य आहेत. डॉक्टरांच्या या टास्क फोर्सने कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अत्यंत महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली आहे. कोरोना रूग्ण, त्यांची काळजी, त्यांच्यावरची उपचार पद्धती या सगळ्या गोष्टींबाबत मार्गदर्शन करण्याचं काम हे डॉक्टरांच्या टास्क फोर्सने केलं आहे.
राहुल पंडित यांनी मुंबईत ऑक्सिजन जपून कसा वापरावा, ऑक्सिजनचं नियोजन कसं करावं याविषयीचं मोलाचं मार्गदर्शन हे राहुल पंडित यांनी केलं होतं. राहुल पंडित यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये ऑक्सिजन थेरेपीवर भाष्य केलं आहे. मुंबईत जो तुटवडा भासला नाही त्यामध्ये ऑक्सिजन ऑडिट कसं करावं हे देखील त्यांनी समजावून सांगितलं. त्यामुळे दिल्लीसारखा मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा भासला नाही.
डॉ. राहुल पंडित हे मागील 20 वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा त्यांना नॅशनल टास्क फोर्समध्येही होणार आहे.
Corona आणि Oxygen नियोजनाबाबत मुंबईकडून शिका, मोदी सरकारला सुप्रीम कोर्टाने सुनावलं
कोण आहेत डॉ. झरीर उदवाडिया?
डॉ. झरीर उदवाडिया हे हिंदुजा आणि ब्रीच कँडी रूग्णालयात श्वसन विकार तज्ज्ञ म्हणून काम करतात. ड्रग्ज रेझिस्टन्सच्या क्षय रोगात त्यांनी केलेलं संशोधन अत्यंत महत्त्वाचं आहे.त्याची दखल राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत घेण्यात आली आहे. जागतिक आरोग्य परिषदेने क्षयरोगासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्यासाठी निमंत्रित केलेल्या जगभरातील डॉक्टरांमध्ये डॉ. उदवाडिया हे भारतातील एकमेव डॉक्टर होते. डॉ. उदवाडिया हे ग्रांट मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहेत. त्यांनी काही काळ लंडन येथील विविध रूग्णालयांमध्ये काम करून क्षयरोग आणि श्वसनरोग या विषयांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT