Mumbai : अन् मध्यरात्री ४२ व्या मजल्यावर पायऱ्यांवरुन गेले अग्निशमनचे जवान
MLA Kalidas Kolambakar told about the thrilling experience of midnight to Extinguish the fire मुंबई : दादर पूर्वी भागातील आरए रेसिडेन्सी टॉवरमध्ये गुरुवारी (२६ जानेवारी) रात्री ८ च्या सुमारास लागलेली आग मध्यरात्री आटोक्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसंच कोणीही जखमी झालेलं नाही. आग लागताच सोसायटीमधील सर्व रहिवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं होतं. […]
ADVERTISEMENT
MLA Kalidas Kolambakar told about the thrilling experience of midnight to Extinguish the fire
ADVERTISEMENT
मुंबई : दादर पूर्वी भागातील आरए रेसिडेन्सी टॉवरमध्ये गुरुवारी (२६ जानेवारी) रात्री ८ च्या सुमारास लागलेली आग मध्यरात्री आटोक्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसंच कोणीही जखमी झालेलं नाही. आग लागताच सोसायटीमधील सर्व रहिवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं होतं. दारावरची बेल वाजल्यानं शॉर्टसर्किट होऊन आग लागली, अशी प्राथमिक माहिती आहे. संबंधित आग लेव्हल 4 च्या दर्जाची असल्याचंही सांगण्यात येत आहे. (Mumbai Firefighters went down the stairs on the 42nd floor in the middle of the night to Extinguish the fire)
दरम्यान, ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना करावी लागलेली कसरत आणि त्यांचा थरारक अनुभव भाजप (BJP) आमदार कालिसाद कोळंबकर (Kalidas Kolambakar) यांनी सांगितला आहे. आमदार कोळंबकर म्हणाले, ४२ व्या मजल्यावर आग लागली होती. अधिकाऱ्यांना विचारलं पण तिथपर्यंत पाणी घेऊन जाता येत नाही. त्यांनी शिडीच्या माध्यमातून प्रयत्न केला. पण त्यांची क्रेन तेवढ्या उंचीवर पोहोचू शकली नाही, मग ते आतमधून पाईप घेऊन गेले.
हे वाचलं का?
Mood Of the Nation: भारतीयांच्या मनात काय?, देशाच्या राजकारणाची दिशा बदलणारा सर्व्हे
यावेळी आमदार कोळंबकर यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच ही आगल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महापालिका जर ४४ ते ५५ मजल्यांच्या इमारती बांधायला परवानगी देत असेल तर अग्निशमन दलाला तितक्याच तयारीची गरज आहे. अशा परिस्थितीत अग्निशमन दलाकडे आग विझवण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सर्व तंत्र विकसित करणं आवश्यक आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
ADVERTISEMENT
Mood of the Nation: मोदी की गांधी, आज निवडणुका झाल्या तर कोणाची येईल सत्ता?
ADVERTISEMENT
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आग लागलेली सोसायटी नव्यानेच बांधण्यात आली होती. यात विकासकाने कोणतीही अग्निशमन यंत्रणा तयार केली नाही. तसंच यावेळी लिफ्टही बंद असल्यानं अग्निशमनच्या जवानांना मोठी कसरत करावी लागली. ४२ मजले पायऱ्यांवरुन चढून ही आग विझविण्यात आली. आग विझवण्यासाठी १६ फायर इंजिन, ४ जंबो टँकर, ९० मीटर उंच क्रेनसह इतर उपकरणांची गरज लागली. याशिवाय घटनास्थळी एक रुग्णवाहिकाही होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT