Mumbai Rains: मुंबईसाठी पुढचे चार दिवस महत्वाचे, मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई: मान्सून मुंबईत (Mumbai Rains) दाखल झाल्यापासून पावसाच्या जोरदार सरी सतत बरसत आहेत. त्यातच आता पुढील दोन दिवस (11 आणि 12 जून) मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस (Heavy to very Heavy Rain) पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याशिवाय 13 आणि 14 जून या पुढील दोन दिवसात प्रचंड मुसळधार पावसाच्या सरी (Extremely Heavy Rain) […]
ADVERTISEMENT
मुंबई: मान्सून मुंबईत (Mumbai Rains) दाखल झाल्यापासून पावसाच्या जोरदार सरी सतत बरसत आहेत. त्यातच आता पुढील दोन दिवस (11 आणि 12 जून) मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस (Heavy to very Heavy Rain) पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याशिवाय 13 आणि 14 जून या पुढील दोन दिवसात प्रचंड मुसळधार पावसाच्या सरी (Extremely Heavy Rain) बरसण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
मागील दोन दिवसापासून मुंबईत सतत जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. पहिल्याच पावसात मुंबईत प्रचंड पाऊस कोसळल्याने जवळजवळ अवघी मुंबई जलमय झाली होती. आज (10 जून) देखील पावसाच्या जोरदार सरी अधूनमधून बरसत होत्या. मात्र आता उद्यापासून पुढील चार दिवस हे मुंबई आणि जवळच्या परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.
Mumbai Rains: पहिल्याच पावसात मुंबई पाण्यााखाली, पाहा Exclusive फोटो
हे वाचलं का?
दरम्यान, हवामानाचा खात्याने रेड अलर्टही जारी केला आहे. IMD ने अर्थातच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत 9 ते 13 जून या चार दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हा आधीपासूनच वर्तवलेला आहे.
9 जूनला मुंबईत झालेल्या पावसाने मुंबईची दाणादाण उडवली होती. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता, अंधेरी सब वे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठलं होतं. पावसाच्या साठलेल्या पाण्यातून वाट काढणं हे वाहनांना कठीण जात होतं.
ADVERTISEMENT
9 जूनला मुंबईत झालेल्या पावसाने मुंबईची दाणादाण उडवली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता, अंधेरी सब वे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठलं होतं. पावसाच्या साठलेल्या पाण्यातून वाट काढणं हे वाहनांना कठीण जात होतं.
ADVERTISEMENT
समजून घ्या : पावसाळ्यात देण्यात येणारे रेड-ऑरेंज अलर्ट म्हणजे काय?
कोकणातही अति मुसळधार पावसाचा इशारा
दरम्यान उद्यापासून 13 जूनपर्यंतच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे सर्व विभाग प्रमुखांनी आणि यंत्रणांनी सतर्क करावे तसे सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग प्राधिकरणाने पथके तैनात ठेवावीत असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.
9 ते 13 जून कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या अधिनस्त यंत्रणांना सतर्क करावे सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग प्राधिकरणाने पथके तैनात ठेवावीत – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी https://t.co/OOO16SegA7 @MahaDGIPR @InfoDivKolhapur
— DISTRICT INFORMATION OFFICE, SINDHUDURG (@InfoSindhudurg) June 9, 2021
दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातही 11 जून ते 14 जून या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यादरम्यान, रत्नागिरीसह कोकण किनारपट्टीतील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Mumbai Rains: 13 जूनपर्यंत मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा, ऑरेंज अलर्टही जारी
ऑरेंज अलर्ट म्हणजे काय?
ऑरेंज अलर्टमध्ये रेड अलर्टपेक्षा थोडी कमी धोकादायक स्थिती असते, पण इथेही यंत्रणांनी सतर्क राहणं गरजेचं असतं. ऑरेंज अलर्टमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला असतो.
इथेही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होण्याचा धोका असतो. जसं निसर्ग वादळाच्या वेळेला मोठ्या प्रमाणात नुकसान रायगड-रत्नागिरीत झालं, पण मुंबईतही झाडं उन्मळून पडलेली, अनेक गाड्यांचं नुकसान झालेलं, रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर झाडं कोसळतात, आणि त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे रेड अलर्टपेक्षा ऑरेंज अलर्ट कमी धोकादायक जरी असला, तरी या अलर्टमध्येही नुकसान होतं, आणि म्हणूनच मी पहिले सांगितलं तसं, ऑरेंज अलर्टमध्येही यंत्रणांना तयारी करून ठेवायला सांगितली जाते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT