मुंबईकरांची आता विविध सामान खरेदीसाठी गर्दी.. सुपरमार्केटबाहेर रांगा
एकीकडे मुंबईसह राज्यभरात कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. महाराष्ट्रात नुकताच वीक एन्ड लॉकडाऊनही पार पडला.. राज्यात कोरोना रूग्ण वाढत असल्याने आठ किंवा 14 दिवसांचा लॉकडाऊनही लागण्याची शक्यता आहे. अशात मुंबईकरांनी आता खरेदीसाठी विविध सुपरमार्केट आणि दुकांमध्ये गर्दी केली आहे. मोठ्या रांगा दुकानांबाहेर आणि सुपर मार्केटबाहेर लागल्याचं चित्र आहे. ‘मी माझ्या मुलीसोबत किराणाचं सामान खरेदी करायला […]
ADVERTISEMENT
एकीकडे मुंबईसह राज्यभरात कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. महाराष्ट्रात नुकताच वीक एन्ड लॉकडाऊनही पार पडला.. राज्यात कोरोना रूग्ण वाढत असल्याने आठ किंवा 14 दिवसांचा लॉकडाऊनही लागण्याची शक्यता आहे. अशात मुंबईकरांनी आता खरेदीसाठी विविध सुपरमार्केट आणि दुकांमध्ये गर्दी केली आहे. मोठ्या रांगा दुकानांबाहेर आणि सुपर मार्केटबाहेर लागल्याचं चित्र आहे.
ADVERTISEMENT
‘मी माझ्या मुलीसोबत किराणाचं सामान खरेदी करायला आलो आहे. लॉकडाऊनबाबत सगळीच अनिश्चितता आहे. अशावेळी घरात लागणाऱ्या गोष्टी संपल्या तर काय करायचं? हा प्रश्न पडल्याने आम्ही आज किराणा सामान घ्यायला आलो आहोत. आम्ही घरात लागणारं सामान भरलं की निश्चिंत होऊ असं खरेदीसाठी आलेल्या सीमाने(बदलेलं नाव) सांगितलं.
हे वाचलं का?
किराणा मालाची दुकानं असोत किंवा फूड कोर्ट असोत तिथे मुंबईकरांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या आहेत. आम्ही सुट्टीच्या दिवशी दुकानं सुरू ठेवली आहेत असा फलक असूनही लोक तास-तासभर रांगेत उभं राहून सामान खरेदी करत आहेत. अनेक लोक एक तास किंवा त्यापेक्षा जास्त तासही रांगेत उभे राहून सामान खरेदी करत आहेत. लोक अशावेळी ऑनलाईन खरेदीचा पर्याय का निवडत नाहीत हा देखील एक प्रश्न आहेच…
एका मुंबईकराने सांगितले, ‘आमच्या सोसायटीने कठोर नियम केले आहेत. आमच्या सोसायटीत काही कोरोना रूग्ण गेल्या वर्षी आढळले होते. काही जणांचा मृत्यूही झाला होता. त्यामुळे हे नियम कठोर आहेत. आता दुसऱ्या लाटेत कुणालाही तशी रिस्क घ्यायची नाही. आम्ही गेटजवळ घेऊन अत्यावश्यक सामान घेऊ शकतो पण ऑनलाईन मागवू शकत नाही. मी आत्ताच इथे सामान घ्यायला आलो आहे जेणेकरून बाहेर पडावं लागू नये.’
ADVERTISEMENT
आणखी एक मुंबईकर नाव न सांगण्याच्या अटीवर हे सांगतो की मला असं वाटतंय या दुकानांमधला साठा संपेल.. तो संपायच्या आत घरी भरून घेतलेला बरा.. मला माहित आहे गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या काळात काय झालं होतं. त्यामुळे मला आता ते टेन्शन नको आहे. आम्ही आत्ताच घरात डाळी, तांदूळ हे भरून ठेवत आहोत. ते भरून ठेवण्यात काहीही नुकसान नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT