व्हेल माशाची उलटी विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक, क्राईम ब्रांचची कारवाई

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेने लोअर परळ भागातून व्हेल माशाची उलटी विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक आरोपी हा माजी पोलीस अधिकारी आहे. बाजारात या उलटीची किंमत ही ७ कोटींच्या घरात असल्याचं कळतंय.

ADVERTISEMENT

अनेकदा व्हेल माशाची उलटी ही समुद्रातील पाण्यावर तरंगताना किंवा किनाऱ्यावर आढळते. या उलटीचा अनेक गोष्टींसाठी वापर होतो. महागडे परफ्युम, औषधं, दारु मध्ये याचा वापर होतो. तसेच काही पदार्थांमध्ये चवीसाठीही याचा वापर होतो. क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना दोन माणसं लोअर परळ भागात व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.

यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी सिताराम मिल्स परिसरात सापळा रचला. यावेळी दोन आरोपी SUV गाडीतून आले. पोलिसांनी या दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे व्हेल माशाची उलटी सापडली. या प्रकरणात एक आरोपी हा पायधुनी पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होता. २०१६ साली भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन त्याला नोकरीवरुन निलंबीत करण्यात आलं होतं. दोन्ही आरोपी हे रायगड जिल्ह्यातील अलिबागचे असून समुद्रकिनाऱ्यावर त्यांना ही उलटी मिळाल्याचं समोर येतंय. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT