वाहनांसाठीचा ‘कलर कोड’चा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला मागे
कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्यात आलेत. त्याचसोबत रस्त्यांवर गाड्यांची गर्दी कमी व्हावी मुंबई पोलिसांकडून गाड्यांवर कलर कोड ही पद्धत लागू करण्यात आली होती. मात्र आता मुंबई पोलिसांकडून हा कलर कोडचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांच्या या ट्विटमध्ये नमूद केल्याप्रमाणे, ‘प्रिय मुंबईकरांनो. लाल, पिवळा, हिरवा […]
ADVERTISEMENT
कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्यात आलेत. त्याचसोबत रस्त्यांवर गाड्यांची गर्दी कमी व्हावी मुंबई पोलिसांकडून गाड्यांवर कलर कोड ही पद्धत लागू करण्यात आली होती. मात्र आता मुंबई पोलिसांकडून हा कलर कोडचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
मुंबई पोलिसांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांच्या या ट्विटमध्ये नमूद केल्याप्रमाणे, ‘प्रिय मुंबईकरांनो. लाल, पिवळा, हिरवा रंग #EmergencyStickers वर्गीकरण बंद केले जात आहे. तथापि, संपूर्ण तपासणी चालू ठेवली जाईल आणि आम्ही आशा करतो की, आपण #TakingOnCorona मध्ये आमच्या पाठीशी उभे राहाल आणि घराबाहेरची सर्व अनावश्यक / विना-आपत्कालीन हालचाल टाळाल.’
प्रिय मुंबईकरांनो.
लाल, पिवळा, हिरवा रंग #EmergencyStickers वर्गीकरण बंद केले जात आहे. तथापि, संपूर्ण तपासणी चालू ठेवली जाईल आणि आम्ही आशा करतो की, आपण #TakingOnCorona मध्ये आमच्या पाठीशी उभे राहाल आणि घराबाहेरची सर्व अनावश्यक / विना-आपत्कालीन हालचाल टाळाल.#StayHomeStaySafe— Mumbai Police (@MumbaiPolice) April 23, 2021
यामध्ये अत्यावश्यक सेवेतील वाहनांवर पिवळा कलर कोड असणार होता. ज्यामध्ये बॅकिंग क्षेत्रातली वाहनं, रेल्वे कर्मचाऱ्यांची वाहनं, इन्शुरन्स कंपन्यांची वाहनं, पत्रकारांना घेऊन जाणारी वाहनं यांचा समावेश होता. मेडिकल सेवा पुरवणाऱ्या वाहनांवर लाल कलरचा कोड देण्यात आलेला. तर भाजीपाला, फळं, बेकरीतले पदार्थ वाहून नेणारी वाहनं, डेअरी म्हणजेच दूध उत्पादनं वाहून नेणारी वाहनं या सगळ्यांना हिरव्या रंगाचा कलर कोड असणार होता.
हे वाचलं का?
कोणत्या कॅटेगरीसाठी कोणता Colour Code?, अत्यावश्यक सेवांच्या वाहन चालकांसाठी महत्त्वाची माहिती
मुंबईत लॉकडाऊन दरम्यान देखील वाहतूक कोंडी होत असल्याचं दिसून येत होतं. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवांच्या वाहनांसाठी कलर कोड आणण्याचा निर्णय मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतला होता. मात्र एका आठवड्यातच हा गाड्यांवरील कलर कोडचा वापर रद्द करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT