डॉ. शीतल आमटे मृत्यू प्रकरण : ‘त्या’ टॅबमध्ये दडलंय तरी काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

डॉ. विकास आमटे यांची मुलगी आणि समाजसेवट बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांनी काही महिन्यांपूर्वी आनंदवनात विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर डॉ. शीतल आमटे काम करत होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर आमटे कुटुंबातील मतभेद पहिल्यांदा समोर आले होते. शीतल यांच्या सासरच्या मंडळींनीही आमटे कुटुंबावर काही आरोप केले होते. दरम्यान चंद्रपूर पोलिसांनी या प्रकरणात डॉ. शीतल आमटे यांचा लॅपटॉप, टॅब आणि ताब्यात घेतला होता.

ADVERTISEMENT

या टॅबमध्ये दडलंय तरी काय याचा तपास मुंबई पोलिसांची सायबर टीम करत होती. परंतू या टॅबला Eye Password असल्यामुळे हा पासवर्ड क्रॅक करण्यात मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाला अपयश आलं आहे. त्यामुळे चंद्रपूर पोलिस हा आता टॅब पुण्याच्या central forensic science laboratory कडे देणार आहेत. याव्यतिरीक्त शीतल आमटे यांच्या लॅपटॉप आणि दोन मोबाईल फोनचा डेटाही पूर्णपणे रिकव्हर न झाल्यामुळे या वस्तूही पुण्याच्या central forensic science laboratory कडे सोपवण्यात आले आहेत. या इलेक्ट्रॉनिक गॅजेटच्या माध्यमातूनच शीतल आमटे यांनी आत्महत्या का केली याची कारणं समोर येऊ शकतात असं चंद्रपूर पोलिसांचं म्हणणं आहे.

आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शीतल आमटे यांनी आनंदवनातील आपल्या राहत्या घरी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ३० नोव्हेंबरला घडली होती. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात श्वास अडकल्यामुळे त्यांचा मृत्यु झाला असल्याचं समोर आलं होतं. पोलीस तपासात घातपात झाल्याचा प्रथमदर्शनी पुरावा समोर आलेला नाही. या प्रकरणात पोलिसांना सायबर आणि फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या अहवालाची प्रतीक्षा होती. परंतू मुंबई पोलिसांना शीतल यांच्या टॅबचा पासवर्ड शोधण्यात अपयश आल्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आणखी काही कालावधी जाण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT