मुंबईतील PSI चा कोरोनाने घेतला बळी, दुसरी लाट ठरतेय अधिक प्राणघातक

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: राज्यात आलेली कोरोनाची दुसरी लाट ही किती भयंकर आहे हे आता आपल्याला हळूहळू दिसू लागलं आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मृतांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता मुंबईतील एका पोलीस अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. वाकोला पोलीस स्थानिकातील PSI मोहन दगाडे यांचं आज (सोमवार) पहाटे निधन झालं.

ADVERTISEMENT

54 वर्षीय पीएसआय दगाडे हे सुरुवातीला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांना तात्काळ मुंबईतील बीकेसी कोविड-19 सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना सुरुवातीलाच कोरोनाची लक्षणं दिसून आली होती. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर सातत्याने उपचार सुरु होते. पण त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. काल रात्री उशिरा त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास त्यांचं निधन झालं.

अजित पवारांच्या बारामतीत भीषण परिस्थिती, कोरोना रुग्णांवर हॉस्पिटलच्या व्हरांड्यात उपचार

हे वाचलं का?

दरम्यान, गेल्या वर्षभरात अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसंच कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले प्राणही गमवाले आहेत. दरम्यान, दुसर्‍या लाटेत पोलिस अधिकाऱ्याचा हा पहिला मृत्यू आहे.

कोरोनाचा व्हायरसची दुसरी लाट ही अत्यंत प्राणघातक असल्याचं दिसून येत आहे. अशावेळी सरकार देखील पुन्हा कठोर लॉकडाऊन करण्याच्या निर्णयापर्यंत पोहचलं आहे. कारण जर पुढील काही दिवसात कोरोनाची साखळी मोडली नाही तर राज्यातील परिस्थिती भयंकर होऊ शकते आणि मृतांचा आकडा वेगाने वाढू शकतो.

ADVERTISEMENT

मुंबईतील 62 खासगी रुग्णालयात आजपासून पुन्हा लसीकरण सुरू, ही आहे रुग्णालयांची यादी

ADVERTISEMENT

कोरोनाची दुसरी लाट अटोक्यात आणण्यासाठी सरकारला अनेक स्तरावर प्रयत्न करावे लागणार आहेत. एकीकडे राज्यातील आरोग्य सेवा ही डळमळीत झाल्याचं दिसून येत असताना दुसरीकडे सरकारने लॉकडाऊन करु नये अशी भूमिका विरोधकांसह काही संघटनांनी घेतली आहे.

आता महाराष्ट्रात लॉकडाऊन अटळ

महाराष्ट्रात कोरोना रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन लावावा लागणार आहे ही बाब अपरिहार्य आहे. त्याच अनुषंगाने डॉक्टरांच्या टास्क फोर्ससोबत काल (रविवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. मुख्य मुद्दा होता तो लॉकडाऊन संदर्भातला.

महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आणायची असेल तर 14 दिवसांचा कठोर लॉकडाऊन लावण्यात यावा अशी सूचना या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झालेल्या डॉक्टरांनी मांडली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आठ दिवसांचा लॉकडाऊन लावण्याच्या बाजूने होते.

महाराष्ट्रात Lockdown शिवाय आता पर्याय नाही, टास्क फोर्सचंही हेच मत -राजेश टोपे

टास्क फोर्सच्या तीन सदस्यांनी आठ दिवसांचा लॉकडाऊन लावावा असंही मत मांडलं. मात्र इतर सदस्य हे 14 दिवसांच्या लॉकडाऊनवर ठाम होते. कोरोना संसर्गाची साखळी तोडायची असेल तर किमान 14 दिवस लॉकडाऊन लावावा लागेल असं मत या समितीने मांडलं. एक रूग्ण हा किमान 25 जणांना बाधित करत आहे असंही डॉक्टरांच्या टास्क फोर्सने सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT