मोठी बातमी: एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याला NIA कडून अटक, सचिन वाझेच्या ‘राईट हँड’ला ठोकल्या बेड्या

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील संशयित कार प्रकरणी आता NIA ने आणखी एक मोठी कारवाई करत मुंबई पोलीस दलातील अधिकारी रियाझ काझी याला अटक केली आहे. NIA च्या अटकेत असलेल्या सचिन वाझे याचा CIU मधील सर्वात विश्वासू अधिकारी म्हणून रियाझ काझी हा ओळखला जात होता. त्यामुळे आता त्याच्या अटकेने सचिन वाझे हा आणखी अडचणीत सापडणार आहे.

ADVERTISEMENT

दुसरीकडे रियाझ काझीच्या अटकेने मुंबई पोलीस दलाला आणखी एक हादरा बसला आहे. कारण या संपूर्ण प्रकरणाने आधीच मुंबई पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे. अशावेळी आता आणखी एका पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आल्याने मुंबई पोलिसांसाठी हा आणखी एक मोठा धक्का समजला जात आहे.

दरम्यान, थोड्याच वेळात काझीला एनआयएच्या विशेष कोर्टात हजर केलं जाईल आणि त्यानंतर त्याच्या कोठडीची मागणी केली जाईल. तर दुसरीकडे सचिन वाझे हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून आता त्याचा मुक्काम तळोजा जेलमध्ये आहे.

हे वाचलं का?

रियाज काझींकडून अँटिलीया प्रकरणातले काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न – NIA ला संशय

रियाझ काझीला का करण्यात आली अटक?

ADVERTISEMENT

सचिन वाझे याच्या अटकेनंतर NIA च्या रडावर सर्वात आधी एपीआय रियाझ काझी हाच होता. त्यामुळे गेल्या दीड महिन्यात अनेक दिवस आणि अनेक तास NIA ने रियाझ काझी याची कसून चौकशी केली होती. वारंवार त्याला NIA कार्यालयात बोलावलं जायचं आणि तिथे या सगळ्या प्रकरणी त्याची चौकशी केली जात होती.

ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वी NIA ने सचिन वाझेंना सोबत घेऊन मिठी नदीच्या पात्रात सर्च ऑपरेशन केलं होतं. ज्यात NIA ला एक DVR, CPU आणि काही नंबरप्लेट मिळाल्या होत्या. दरम्यान सचिन वाझे यांच्या CIU मधील तत्कालीन सहकारी रियाज काझी यांनी अँटिलिया प्रकरणातील काही पुरावे नष्ट केल्याचा NIA चा संशय अधिक बळावला होता. तसेच NIA ला विक्रोळी परिसरातील एका नंबर प्लेटच्या दुकानात रियाझ काझी आत जात असतानाचं एक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं होतं. त्यामुळे या संपूर्ण गुन्ह्यात रियाझ काझी हा सक्रीय असल्याच्या आणि या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे नष्ट केल्याप्रकरणी NIA ने अटक केली असल्याचं सांगितलं जात आहे.

सचिन वाझेंच्या अडचणी वाढल्या, विश्वासू सहकारी रियाझ काझी माफीचा साक्षीदार होणार?

रियाझ काझी याचं नाव सर्वात प्रथम केव्हा आलं समोर?

सचिन वाझेला अटक केल्यानंत संशयित स्कॉर्पिओ कार ही वाझेच्या ठाण्यातील सोसायटीमध्ये अनेक दिवस पार्क करण्यात आलं असल्याचं एनआयएला समजलं तेव्हा एनआयएने तेथील सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याचा प्रयत्न केला. याचवेळी सर्वप्रथम एपीआय रियाझ काझी याचं नाव समोर आलं.

27 फेब्रुवारी 2021 रोजी सचिन वाझेच्या CIU टीममधील एपीआय रियाझ काझी हा सचिन वाझे राहत असलेल्या ठाण्यातील सोसायटीत आपल्या टीमसह गेला होता. यावेळी त्याने सोसायटी पदाधिकाऱ्यांकडे तेथील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती.

मात्र, तुम्ही पत्र दिल्याशिवाय हे सीसीटीव्ही फुटेज देता येणार नाही असं तेथील पदाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं होतं. त्यानंतर काझी यांनी त्यासंबंधी पत्र सोसायटीला दिलेलं. त्यानंतर सोसायटी पदाधिकाऱ्यांनी 17 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी दरम्यानचं सीसीटीव्ही फुटेज हे सीआययूच्या टीमकडे दिलं. ही माहिती समोर आल्यानंतर एनआयएने रियाझ काझीची चौकशी सुरु केली होती.

हेच सीसीटीव्ही फुटेज डिलीट सचिन वाझे आणि त्याच्या टीमने डिलीट केलं असल्याचा दावा NIA कडून करण्यात येत आहे. कारण मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील तो सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरु शकतो.

NIA ने घेतला CIUमधील ‘या’ पोलीस अधिकाऱ्यांचा जबाब, वाझेंचं पुढे काय होणार?

रियाझ काझीला का करण्यात आली असावी अटक?

सचिन वाझे याच्या अटकेनंतर NIA च्या रडावर सर्वात आधी एपीआय रियाझ काझी हाच होता. त्यामुळे गेल्या दीड महिन्यात अनेक दिवस आणि अनेक तास NIA ने रियाझ काझी याची कसून चौकशी केली होती. वारंवार त्याला NIA कार्यालयात बोलावलं जायचं आणि तिथे या सगळ्या प्रकरणी त्याची चौकशी केली जात होती.

काही दिवसांपूर्वी NIA ने सचिन वाझेंना सोबत घेऊन मिठी नदीच्या पात्रात सर्च ऑपरेशन केलं होतं. ज्यात NIA ला एक DVR, CPU आणि काही नंबरप्लेट मिळाल्या होत्या. दरम्यान सचिन वाझे यांच्या CIU मधील तत्कालीन सहकारी रियाज काझी यांनी अँटिलिया प्रकरणातील काही पुरावे नष्ट केल्याचा NIA चा संशय अधिक बळावला होता. तसेच NIA ला विक्रोळी परिसरातील एका नंबर प्लेटच्या दुकानात रियाझ काझी आत जात असतानाचं एक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं होतं. त्यामुळे या संपूर्ण गुन्ह्यात रियाझ काझी हा सक्रीय असल्याच्या आणि या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे नष्ट केल्याप्रकरणी NIA ने अटक केली असल्याचं सांगितलं जात आहे.

काही दिवसांपूर्वीच रियाझ काझीची CIU मधून करण्यात आली होती बदली

दरम्यान, सचिन वाझेच्या अटकेनंतर परमबीर सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन हटविण्यात आल्यानंतर दोनच दिवसांनी मुंबईतील अनेक पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये सचिन वाझे ज्या CIU ब्रांचमध्ये काम करत होता त्याच ब्रांचमधील तब्बल 65 जणांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये रियाज काझी याचा देखील समावेश होता. त्यावेळी रियाझला CIU मधून Local Arms Unit मध्ये टाकण्यात आलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT