मुलुंडमध्ये पडलेल्या दरोड्याचा यशस्वी तपास, ८ आरोपी अटकेत; ३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई उपनगरातील मुलुंड परिसरात व्ही.पी.एंटरप्रायजेसच्या ऑफिसवर पडलेल्या दरोड्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. तपासाची चक्र वेगाने हलवत मुंबई पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत ८ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी मुद्देमालासह शस्त्रही ताब्यात घेतली आहेत.

ADVERTISEMENT

दरोडेखोरांनी लुटलेल्या रकमेपैकी ३७ लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत. याचसोबत आरोपींकडून ४ पिस्तुल, दोन देशी बनावटीचं पिस्तुल आणि २७ जिवंत काडतुसंही ताब्यात घेण्यात आली आहेत. उर्वरित रकमेचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींनी दरोडा टाकून सुमारे ७५ ते ८० लाख रुपये पळवले होते. मुंबई पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल त्यांचं कौतुक केलं जातंय.

प्रवाशाचा मोबाईल घेऊन पळत होता चोरटा, पोलिसांनी पाठलाग करत घेतलं ताब्यात, पाहा थरारक व्हिडीओ

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT