मुंबई : दादर परिसरातील वाहतूक मार्गात मोठे बदल; पार्किंगच्या ठिकाणांमध्ये बदल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी येथील चैत्यभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून त्यांचे अनुयायी दर्शनासाठी येतात. महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी, दादर व शिवाजी पार्क परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीच्या मार्गात प्रशासनाकडून बदल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

वन-वे मार्ग/वाहतुकीसाठी रस्ते बंद

१) एस. के. बोले रोड – हा रस्ता सिद्धीविनायक मंदिर जंक्शनपासून हनुमान मंदिरापर्यंत एक दिशा मार्ग राहील म्हणजेच हनुमान मंदिरकडून एस. के. बोले रोडवर प्रवेश बंद राहील.

हे वाचलं का?

२) भवानीशंकर रोड – हा रस्ता कबुतरखान्यापासून गोखले रोड दक्षिण जंक्शनपर्यंत वन वे मार्ग राहील म्हणजेच गोखले रोड, दक्षिण, गोपीनाथ चव्हाण चौक येथून भवानी शंकर मार्गावर बेस्ट बसेस व अत्यावश्यक सेवा असलेली वाहने वगळून इतर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहिल.

३) स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग – हा मार्ग सिद्धीविनायक मंदिर जंक्शनपासून हिंदूजा हॉस्पिटलपर्यत वाहतुकीकरीता बंद राहिल. तथापी स्थानिक रहिवाशांची वाहने हिंदूजा हॉस्पिटलकडून शिवाजी पार्क रोड नं. 5 म्हणजे पांडूरंग नाईक मार्ग जंक्शनपर्यत जाऊ शकतील.

ADVERTISEMENT

४) रानडे रोड सर्व प्रकारच्या वाहतुकीकरीता बंद असेल.

ADVERTISEMENT

५) ज्ञानेश्वर मंदिर रोड, एस. व्ही. एस. रोड जंक्शनपासून दादर चौपाटीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीकरीता बंद राहिल.

६) आवश्यकता भासल्यास दादर टी.टी. कडून कोतवाल गार्डनकडे जाणाऱ्या वाहनांसाठी टिळक ब्रिजवर बेस्ट बसेस व अत्यावश्यक सेवा असलेली वाहने वगळून इतर वाहनांना प्रवेश बंद असणार आहे.

७) सर्व प्रकारची जड वाहने, माल वाहतुकीची वाहने, बेस्ट बसेस वगळून माहिम जंक्शन येथून मोरी रोड मार्गे सेनापती बापट मार्गावर वळविण्यात येणार आहे.

वाहतुकीची कोंडी झाल्यास पर्यायी मार्ग

१) दक्षिण वाहीनी पश्चिम द्रुतगती मार्गे बांद्रामार्गे दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहनांनी कोंडी झाल्यास कलानगर जंक्शन येथून डावे वळण घेऊन धारावी टी जंक्शन ते सायन रेल्वे स्थानक किंवा 60 फुट रोड, कुंभारवाडामार्गे सायन रूग्णालय येथे उजवे वळण घेता येईल अथवा बांद्रा-वरळी सागरी उड्डाणपुलमार्गे (सी लिंक) दक्षिण मुंबईकडे जाता येईल.

२) उत्तर वाहीनी कुलाबा तसेच सीएसटी मार्गे उत्तर वाहीनी वरून जाणाऱ्या वाहनांनी कोंडी झाल्यास पी. डीमेलो रोड, बॅरीस्टर नाथ पै रोड, जकेरिया बंदर रोड, आर. ए. के. मार्ग यांचा वापर करून माटुंगा येथील अरोरा ब्रिजखाली उजवे वळण घेवून पुढे सायन हॉस्पिटल जंक्शन मार्गे पुढे जावे अथवा बांद्रा-वरळी सागरी उड्डाणपूल मार्गे उत्तर मुंबईकडे जाता येईल.

३) उत्तर वाहिनी महालक्ष्मी रेल्वे स्थानक जंक्शन कडून उत्तर वाहिनी वरून जाणाऱ्या वाहनांनी कोंडी झाल्यास डॉ. ई. मोजेस रोड, रखांग चौक येथे उजवीकडे वळण घेऊन सेनापती बापट मार्गे पुढे मार्गक्रमण करावे.

४) पूर्व द्रुतगती महामार्ग – पूर्व द्रुतगती महामार्गाने दक्षिणेकडे जाणाऱ्यांनी वडाळा ब्रिजचा वापर करून बरकत अली नाका, बीपीटी कॉलनी, पुर्व मुक्त द्रुतगती मार्गाचा वापर करावा.

‘नो पार्किंग’ झोन

चैत्यभुमीकडे जाणाऱ्या शिवाजीपार्क परिसरातील एस.व्ही.एस. रोड, रानडे रोड, एन.सी. केळकर रोड, केळूस्कर रोड (दक्षिण), केळुस्कर (उत्तर), गोखले रोड (दक्षिण व उत्तर), टिळक ब्रीज, भवानी शंकर रोड, एस.के. बोले मार्ग, लखमषी नप्पू रोड, माटुंगा हे रस्ते हे 4 डिसेंबरपासून ते 7 डिसेंबरच्या रात्री 12वाजेपर्यंत ‘नो पार्किंग’ झोन म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत.

पार्किंगची ठिकाणं : पश्चिम द्रुतगती मार्ग

१) दादर येथील सेनापती बापट मार्ग मोरी रोड ते झारापकर मार्ग, २) कामगार मैदान सेनापती बापट मार्ग, ३) कोहिनुर स्क्वेअर मिल कंम्पा व माहिम रेती बंदर. ठाणे व नवी मुंबईकडून

पूर्व द्रुतगती मार्गाने येणाऱ्या वाहनांसाठी : १) इंडिया बुल फायनान्स सेटर, २) लोढा कमला मिल रोड, ३) एडनवाला रोड, फिरदोस रोड,फाईव्ह गार्डन परिसर.

एल.बी.एस. रोडसाठी १) इंडिया बुल फायनान्स सेंटर, २) लोढा कमला मिल रोड, ३) एडनवाला रोड, फिरदोस रोड, फाईव्ह गार्डन परिसर.

वाशी ब्रिज- जिजाबाई भोसले मार्गाने येणाऱ्या वाहनांसाठी इंडिया बुल सेंटर व आर.ए.के.चार रोड.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT