माणूसकी महत्वाची! गावकऱ्यांनी जबाबदारी नाकारली, सांगलीत मुस्लीम बांधवांनी हिंदू महिलेवर केले अंत्यसंस्कार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येताना दिसत आहे. अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आपले प्राण गमवावे लागत आहेत. आजही रुग्णांच्या मृत्यूनंतर कोरोनाच्या संसर्गाची भीती असल्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करतानाही अनेकांच्या मनात भीती असते. सांगलीत अशाच भीतीमधून कोरोनाग्रस्त महिलेचा मृतदेह गावी परत आणू नका अशी भूमिका गावकऱ्यांनी केली. अखेरीस शहरातील मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या काही मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत हिंदू पद्धतीने महिलेवर अंत्यसंस्कार केले.

ADVERTISEMENT

सांगलीत भयावह स्थिती ! मालवाहू रिक्षेत ऑक्सिजन लावून पेशंटची बेड शोधण्यासाठी ससेहोलपट

सध्याच्या खडतर काळात जाती-धर्माच्या भिंती मोडत माणूसकीला पहिलं प्राधान्य देणाऱ्या मनदी ट्रस्टच्या कार्यकर्त्यांचं सध्या सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. सांगलीच्या नागज तालुक्यातील कवठेमहांकाळ येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाली. आजारी महिलेला सुरुवातीला मिरज-सांगली भागात बेडसाठी वणवण फिरावं लागलं. अखेरीस मिरज येथील क्रीडा संकुलात या महिलेला बेड मिळाला. या महिलेवर उपचार सुरु झाल्यानंतर शनिवारी संध्याकाळी पाच वाजता तिचा मृत्यू झाला.

हे वाचलं का?

सांगली : महापालिका क्षेत्रात सात दिवसांचा जनता कर्फ्यू

महिलेच्या मृत्यूनंतर तिच्यासोबत असलेल्या नातेवाईकांनी मृतदेह नागज येथे नेण्याची तयारी केली. परंतू गावातल्या व्यक्तींनी मृतदेह इकडे आणू नका तिकडेच अंत्यसंस्कार करा असं सांगितलं. आता ऐनवेळी अंत्यसंस्काराची तयारी कुठून करायची यामुळे महिलेचे नातेवाईक बावरुन गेले. अखेरीस मदनी ट्रस्टच्या कार्यकर्त्यांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी या नातेवाईंकाची समजूत काढत त्यांना धीर दिला. यानंतर महिलेचा मृतदेह ताब्यात घेत पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीत महिलेवर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

आजही राज्यात अनेक शहरांमध्ये कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेटींग लाइन असल्याचं चित्र पहायला मिळतंय. अनेक ठिकाणी मृतदेहाची हेळसाण होण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत जात-धर्म यांचा विचार न करत गरजू व्यक्तींच्या मदतीला धावून जात सामाजिक सलोखा जपणाऱ्या सांगलीतल्या मदनी ट्रस्टचा आदर्श सर्वांनी घ्यायला हरकत नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT