भाजपमधे असताना माझाही फोन टॅप झाला होता, नाना पटोलेंनी दिली धक्कादायक माहिती
भाजप खासदार असताना माझाही फोन टॅप झाला होता अशी माहिती आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, फडणवीस सरकारच्या काळात माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेनेतील काही महत्वाचे नेते आणि काही आयएएस, आयपीएस अधिकारी यांचेही फोन टॅपिंग केले जात होते. माझा संबंध अंमली पदार्थांच्या तस्करीशी जोडण्याचा प्रयत्न […]
ADVERTISEMENT
भाजप खासदार असताना माझाही फोन टॅप झाला होता अशी माहिती आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, फडणवीस सरकारच्या काळात माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेनेतील काही महत्वाचे नेते आणि काही आयएएस, आयपीएस अधिकारी यांचेही फोन टॅपिंग केले जात होते. माझा संबंध अंमली पदार्थांच्या तस्करीशी जोडण्याचा प्रयत्न करुन हा निंदनीय व निषेधार्ह प्रकार करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
फोन टॅपिंग करताना नावे व पत्ते खोटी तसेच बनावट दाखवून फोन टॅप करण्यात आले. हे फोन टॅपिंग कोणी केले आणि त्यांना परवानगी कोणी दिली ? फोन टॅपिंग करण्याचा उद्देश काय होता ? फोन टॅप करुन एखाद्या व्यक्तीवर पाळत ठेवणे हा गुन्हा आहे तसेच हा प्रकार व्यक्ती स्वातंत्र्याचा भंग करणारे असून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे खपवून घेणार नाही. जे कोणी या फोन टॅपिंगशी संबंधीत होते त्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी, असेही पटोले म्हणाले.
Phone Tapping प्रकरणी IPS रश्मी शुक्लांना अटक होणार नाही-कोर्ट
हे वाचलं का?
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात २०१६-१७ साली फोन टॅपिंग करण्यात आले होते त्यात माझाही फोन टॅप करण्यात आला होता अशी माहिती आपल्याला खासगी टीव्ही चॅनलकडून मिळाली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला असून यात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या नावाखाली राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आले. या प्रकरणी नंबर माझा व अमजद खान असे खोटे नाव वापरण्यात आले होते. या फोन टॅपिंगशी संबंधीत सर्वांची महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
Phone Tapping : गोपनीय अहवाल फोडल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
ADVERTISEMENT
रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगनंतर सुबोध जयस्वाल एक पत्र लिहिलं होतं.. काय आहे त्या पत्रात?
ADVERTISEMENT
पोलिसांच्या बदलीसाठी काही राजकीय संबंध असलेले दलाल काम करत आहेत यासंदर्भातल्या तक्रारी आल्यानंतर आणि आरोप झाल्यानंतर मी हे संपूर्ण प्रकरण तपासलं. त्यासाठी काही फोनही टॅप केले. जाणीवपूर्वक काही फोन नंबर हे सर्व्हिलन्सवर होते. ज्यासाठीची मी रितसर परवानगी घेतली होती. या फोन टॅपिंग आणि इतर गोळा केलेल्या माहितीनंतर काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. यासंदर्भातली माहिती आपण तातडीने मुख्यमंत्र्यांना द्यायला हवी असं मला वाटतं आहे. जे आरोप झाले ते धक्कादायक आहेत आणि समोर आलेलं वास्तवही जळजळीत सत्य आहे.
पोलिसांच्या बदल्याचं रॅकेट आणि त्यासाठी काम करणारे काही दलाल कार्यरत आहेत. या सगळ्यांचा जवळचा संबंध काही राजकारण्यांशी आहे. हे देखील समोर आलं आहे. बदल्यांसाठी काम करणाऱ्या ब्रोकर्सचं रॅकेट आहे ही गंभीर बाब समोर आली आहे. यामध्ये पोलीस निरीक्षकापासून ते मोठ्या पदांपर्यंतच्या बदल्यांचा समावेश आहे.
जो डेटा आणि माहिती समोर आली आहे त्यामध्ये असंही समोर आलं आहे की अशा प्रकारची परिस्थिती २०१७ मध्येही निर्माण झाली होती. त्या प्रकरणी या संदर्भात सखोल चौकशी करून ४०२, ४१९, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १७०, ५११, ३४ या आयपीसीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा सात जणांना अटकही करण्यात आली होती. या अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक असलेला नवाज हा पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.
हे संपूर्ण प्रकरण हे मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं गेलं पाहिजे. तसंच या प्रकरणातले जे दोषी आहेत त्यांच्या संबंधी योग्य ती कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे. पोलीस दलातल्या नियुक्त्यांसाठी हे अशा प्रकारचं दलालांचं रॅकेट असणं योग्य नाही त्यामुळे पोलिसांची प्रतिमा डागाळली जाते. आपण माझ्या या पत्रातील मुद्द्यांचा बारकाईने विचार करून या सर्व बाबी तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवाव्यात. या आशयाचं पत्र रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांना लिहिलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT