Rape Case : अभिनेता पर्ल पुरीला जामीन नाही, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बलात्काराच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या टीव्ही अॅक्टर पर्ल पुरीच्या अडचणी वाढल्या आहेत. पर्ल पुरीला वसई कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी पर्लची कथित एक्स गर्लफ्रेंड करीश्मा तन्नाने पोस्ट शेअर करून पर्लला जामीन मिळाल्याची माहिती दिली होती. मात्र पर्ल पुरीला कोणताही जामीन मिळालेला नाही तर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

या प्रकरणातली पीडिता अल्पवयीन आहे. या पीडितेवर पर्ल पुरीने बलात्कार केल्याचा आरोप आहे. अल्पवयीन पीडितेवर पर्ल पुरीने आधी कारमध्ये बलात्कार केला त्यानंतर अनेकदा बलात्कार केला. या आरोपाखाली आणि POCSO कायद्याच्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्याला वालीव पोलिसांनी अटक केली असून त्याची या प्रकरणी चौकशी सुरू आहे.

पर्ल पुरी हा त्याच्या रिलेशन्समुळे कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री करीश्मा तन्नासोबत त्याचं नातं असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. दोघांमध्ये काही काळ अफेअर सुरू होतं त्यानंतर दोघांचं ब्रेक अप झालं अशाही चर्चा रंगल्या होत्या. मात्र या दोघांमध्ये आता चांगली मैत्री आहे असंही म्हटलं जातं आहे.

हे वाचलं का?

पर्ल पुरीने नागीन 3 च्या शिवाय इतर टीव्ही प्रोग्राममध्येही काम केलं आहे. ब्रह्मराक्षस 2, बेपनाह प्यार, नागार्जुन एक योद्धा, मेरी सासू माँ अशा सीरियल्समध्ये पर्ल पुरीने काम केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT