गडचिरोलीमध्ये दोन नगर पंचायतींवर फडकला शिवसेनेचा भगवा
गडचिरोली जिल्ह्यातील मूलचेरा आणि कुरखेडा या दोन नगर पंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला. मूलचेरा नगर पंचायतीमध्ये शिवसेनेचे विकास नेताम हे नगराध्यक्षपदी निवडुन आले आहेत, तर कुरखेडा नगर पंचायतीमध्ये शिवसेनच्या अनिता बोरकर या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विकासकामांना जनतेने दिलेला हा कौल आहे, […]
ADVERTISEMENT
गडचिरोली जिल्ह्यातील मूलचेरा आणि कुरखेडा या दोन नगर पंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला. मूलचेरा नगर पंचायतीमध्ये शिवसेनेचे विकास नेताम हे नगराध्यक्षपदी निवडुन आले आहेत, तर कुरखेडा नगर पंचायतीमध्ये शिवसेनच्या अनिता बोरकर या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या.
ADVERTISEMENT
गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विकासकामांना जनतेने दिलेला हा कौल आहे, असा सूर या निकालानंतर उमटला आहे.
शेती, आरोग्य, दळणवळण, वीज पुरवठा, रोजगार या क्षेत्रात शिंदे यांनी जिल्हापातळीवर केलेल्या विकासकामांमुळेच शिवसेनेला हे मोठं यश मिळालं. जिल्हा समन्वयक किरण पांडव आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी यांच्या मेहनतीमुळे जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळत आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
‘गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हाच ध्यास मानून केलेल्या कामाला जनतेने दिलेली ही पोचपावती असून गडचिरोली जिल्ह्याला मागास आणि नक्षलग्रस्त जिल्हा ही ओळख पुसून काढण्याच्या दिशेने टाकलेले हे मोठे पाऊल असल्याचे’ मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
आज गडचिरोलीमधील काही नगर पंचायतीमध्ये नगराध्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडली असून उर्वरित ठिकाणी उद्या ही प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेने गडचिरोली सारख्या दुर्गम भागात मिळवलेले मोठे यश असून स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेलं शिवसेना तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली साकार होत असल्याबद्दल शिंदे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT