नागपूर : अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई, १०७ किलो गांजा जप्त; दोन आरोपी अटकेत
नागपूर पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने, एका कारमधून तस्करी केला जाणारा गांजा पकडला आहे. कार सीटच्या खाली एक विशेष जागा बनवून तिकडे हा गांजा लपवण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी १०७ किलो गांजा या कारवाईत जप्त केला आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाला, दिल्लीचा रजिस्ट्रेशन नंबर असलेली एक गाडी अमली […]
ADVERTISEMENT
नागपूर पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने, एका कारमधून तस्करी केला जाणारा गांजा पकडला आहे. कार सीटच्या खाली एक विशेष जागा बनवून तिकडे हा गांजा लपवण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी १०७ किलो गांजा या कारवाईत जप्त केला आहे.
ADVERTISEMENT
अमली पदार्थ विरोधी पथकाला, दिल्लीचा रजिस्ट्रेशन नंबर असलेली एक गाडी अमली पदार्थ घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी जबलपूर महामार्गावर सापळा रचला असता, सदर गाडी पोलिसांना दिसली. पहिल्यांदा तपासणी केली असता या गाडीत त्यांना काहीच सापडलं नाही.
धक्कादायक ! गाडी रस्त्यातून बाजूला घे सांगणाऱ्या पोलिसावर तलवारीने हल्ला
हे वाचलं का?
परंतू यानंतर कारच्या सीटचा खालचा भाग तपासला असता त्या जागेवर १०७ किलो गांजा लपवण्यात आल्याचं दिसून आलं. बाजाराभावाप्रमाणे या गांज्याची किंमत १६ लाखांच्या घरात आहे. गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाया पाहता नागपूर ड्रग्ज माफीयांचं केंद्र बनत असल्याचं दिसून येत आहे.
लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या भाऊ-बहिणीला चाकूचा धाक दाखवून लुटलं, आरोपी अटकेत
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT