नागपुरात थरार : बंदुकीच्या धाकावर घरात घुसून ५० लाखांची मागणी करणाऱ्या युवकाला अटक
नागपुरात शुक्रवारी बंदुकीच्या धाकावर एका कुटुंबाकडून ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या युवकाला पोलिसांनी नाट्यमय रित्या अटक केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या पीपळ फाटा परिसरात राहणाऱ्या राजू वैद्य यांच्या घरी एक अज्ञात तरुण शिरला. या तरुणाकडे चाकू आणि बंदुक होती. या बंदुकीच्या जोरावर तरुणाने तीन तास […]
ADVERTISEMENT
नागपुरात शुक्रवारी बंदुकीच्या धाकावर एका कुटुंबाकडून ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या युवकाला पोलिसांनी नाट्यमय रित्या अटक केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या पीपळ फाटा परिसरात राहणाऱ्या राजू वैद्य यांच्या घरी एक अज्ञात तरुण शिरला. या तरुणाकडे चाकू आणि बंदुक होती. या बंदुकीच्या जोरावर तरुणाने तीन तास ओलीस ठेवत ५० लाखांची मागणी केली. पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
आरोपीजवळ शस्त्र असल्यामुळे तो वैद्य परिवाराला इजा करण्याची भीती होती. यासाठी पोलिसांनी आधी आरोपीशी बोलून त्याला पैसे मिळतील असं आश्वासन दिलं. सर्वात आधी २ लाख, त्यानंतर पुन्हा दोन लाख आणि नंतर पुन्हा एकदा दोन लाख असे तीन टप्प्यांत आरोपीला पैसे देऊन पोलिसांनी त्याला गुंतवून ठेवलं आणि बेसावध असताना त्याच्यावर झडप टाकून त्याला अटक केली.
हे वाचलं का?
या प्रकाराची माहिती मिळताच परिसरात मोठा जमाव निर्माण झाला होता. आरोपीचं नाव अद्याप जाहीर करण्यात आलेलं नसून त्याने हा प्रकार का केला याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत. नागपूर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या पथकाने ही कारवाई करत वैद्य परिवाराचे प्राण वाचवले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT