आणखी एका हत्येने हादरलं नागपूर, पुन्हा अनैतिक संबधाच्या संशयातून हत्या?
योगेश पांडे महाराष्ट्राच्या उपराजधानीत चाललंय काय? असा प्रश्न सध्या महाराष्ट्राला पडला आहे. सोमवारीच नागपूरमध्ये कुटुंबातल्या पाच जणांची हत्या करून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. त्यापाठोपाठ आज पुन्हा एकदा एका तरूणाची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या तरूणाच्या हत्येचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होतो आहे. दिवसाढवळ्या कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील शिवाजी नगर भागात राहणाऱ्या योगेश […]
ADVERTISEMENT
योगेश पांडे
ADVERTISEMENT
महाराष्ट्राच्या उपराजधानीत चाललंय काय? असा प्रश्न सध्या महाराष्ट्राला पडला आहे. सोमवारीच नागपूरमध्ये कुटुंबातल्या पाच जणांची हत्या करून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. त्यापाठोपाठ आज पुन्हा एकदा एका तरूणाची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या तरूणाच्या हत्येचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होतो आहे. दिवसाढवळ्या कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील शिवाजी नगर भागात राहणाऱ्या योगेश धोंगडे या युवकाची हत्या करण्यात आली. ही हत्या अनैतिक संबंधातून झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
योगेश धोंगडे नावाच्या व्यक्ती याच परिसरात राहत होता तर आरोपी हा सुद्धा त्याच परिसरात राहत होता दोघांमध्ये वाद सुरू होता मात्र हा विकोपाला पोहचला आणि गोलू नावाच्या आरोपीने त्याच्यावर नाल्यात उतरत धारदार शस्त्राने वार केले आणि आरोपी फरार झाला. अनैतिक संबंधातून ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत.
हे वाचलं का?
सामूहिक हत्याकांडाने नागपूर हादरलं, पतीकडून पत्नी आणि मुलांसह सासरच्या मंडळीची हत्या
कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिवाजी नगर परिसरात योगेश धोंगडे नावाच्या माणसाची हत्या झाली आहे. गोलू धोटे नावाच्या माणसाने त्याची हत्या केली आहे. यामागे इतर आरोपीही असू शकतात असा आमचा अंदाज आहे. ही हत्या दोन तासांपूर्वी झाली आहे. कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र प्राथमिक अंदाज असा आहे की अनैतिक संबंधाच्या वादातून ही हत्या झाली असावी असं वाटतं आहे. मृत योगेश धोंगडे हा कुठेच काम करत नव्हता. आरोपी गोलू धोटे हा दूध डेअरीवर काम करतो.
ADVERTISEMENT
शिवाजी नगर भागात एक नाला आहे त्या ठिकाणी या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर गोलूने चाकूचे वार करून योगेशला ठार केलं. हा प्रसंग झाला तेव्हा तिथे गोलूची आई आणि पत्नी दोघीही होत्या त्यांनी गोलूला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने काहीही ऐकून घेतलं नाही आणि वार केले. ज्यामध्ये योगेश धोंगडेचा मृत्यू झाला. आरोपी पळून गेला आहे त्याचा शोध आम्ही सुरू केला आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT