नेमकं काय घडलं होतं ‘हल्ला मोहल्ला’ कार्यक्रमावेळी? 400 जणांविरोधात गुन्हा दाखल
नांदेड: नांदेडमध्ये पोलिसांवर भयंकर हल्ला करणाऱ्या 400 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 18 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. वजीराबाद पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळ्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यावेळी नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे की, ‘या प्रकरणातील जो कोणी दोषी असेल त्याला अजिबात सोडलं जाणार नाही.’ त्यामुळे आता पोलीस प्रशासनाने […]
ADVERTISEMENT
नांदेड: नांदेडमध्ये पोलिसांवर भयंकर हल्ला करणाऱ्या 400 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 18 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. वजीराबाद पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळ्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
यावेळी नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे की, ‘या प्रकरणातील जो कोणी दोषी असेल त्याला अजिबात सोडलं जाणार नाही.’ त्यामुळे आता पोलीस प्रशासनाने याप्रकरणी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
‘हल्ला मोहल्ला’ कार्यक्रमावेळी नेमकं काय घडलं होतं?
हे वाचलं का?
नांदेडमधील शीख धर्मीयांचं पवित्र स्थान मानल्या जाणाऱ्या सचखंड हुजूर साहीब गुरुद्वारेत काल (29 मार्च) हल्ला मोहल्ला कार्यक्रमात काही उत्साही तरुणांनी पोलिसांनी केलेलं बॅरिकेडींग मोडत हिंसाचार केला. या घटनेत जमावाने पोलिसांवर हल्ला चढवला. ज्यात नांदेडचे पोलीस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांचा अंगरक्षक दिनेश पांडे यांच्यासह पाच पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले.
नांदेड : ‘हल्ला मोहल्ला’ कार्यक्रमात शीख तरुणांचा पोलिसांवर हल्ला, ५ पोलीस गंभीर जखमी
ADVERTISEMENT
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. परंतू गुरद्वारेच्या व्यवस्थापनाने आपण हा कार्यक्रम गुरद्वारेत करु म्हणत आयोजन केलं. परंतू या कार्यक्रमादरम्यान काही तरुणांनी सर्व नियम धाब्यावर बसवून पोलिसांवर हल्ला केला. आपल्या हातात तलवारी नाचवत या तरुणांनी दहशतीचं वातावरण निर्माण केलं. पोलिसांच्या आठ गाड्यांचा या घटनेत चक्काचूर झाला.
ADVERTISEMENT
हा प्रकार होत असताना गुरुद्वारेचे प्रमुख या तरुणांना थांबण्याचं आवाहन करत होते, परंतू या तरुणांनी कोणाचंही न ऐकता या परिसरात प्रचंड नासधूस केली. या सगळ्या प्रकारामुळे येथील परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, काही काळातच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र, या संपूर्ण प्रकरणामुळे नांदेडकरांमध्ये मात्र काहीसं भीतीचं वातावरण पसरल होतं.
दरम्यान, या प्रकरणी आता कोणाचीही गय न करता मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या हिंसाचारात सहभागी असणाऱ्या अनेकांची धरपकड सुरु करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT