सोनू…तुझ्यावर अजिबात भरवसा नाही! १३ मुलांना फसवून लग्न करुन लुटणारी सोनू शिंदेची टोळी अटकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुलांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्न करुन घरातील पैसे व दागिने लुटून पळून जाणाऱ्या सोनू शिंदे या तरुणीला अखेरीस अटक करण्यात आली आहे. नंदुरबारमध्ये एका मुलाशी लग्न करुन त्याच्याकडून पैसे व दागिने घेऊन पळून गेलेल्या सोनूविरोधात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे चौकशीदरम्यान सोनू ही एकटीच नसून तिच्यासोबत टोळीच असल्याचं समोर आलंय.

ADVERTISEMENT

आतापर्यंत या टोळीने १३ जणांना फसवल्याचं समोर येतंय. हिंगोली आणि अकोला भागात सोनू शिंदेच्या टोळीने असेच प्रकार केल्याचं पोलिसांना चौकशीत समजलंय. वेगवेगळ्या शहरांतील मुलांना फसवून लग्न जुळवण्यासाठी ही टोळी शहरातील दलालांची मदत घ्यायची. दोन आठवड्यांपूर्वी सोनू शिंदेने नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात एका तरुणाशी लग्न जुळवलं.

लग्न ठरल्यामुळे साहजिकच नवरदेव आनंदात होता. लग्नासाठी सोनू शिंदेच्या टोळीतील व्यक्तींनी मुलाकडच्या कुटुंबाकडे काही पैशांची मागणी केली. जी मागणी मुलाकडच्यांनी पूर्ण केली. परंतू लग्न झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच सोनू घरात न नांदता पळून गेली आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला. आपण फसवले गेलो आहेत हे कळताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

हे वाचलं का?

सोनू शिंदेने शाहदा येथील तरुणाकडून १ लाख ३० हजार रुपये घेत पोबारा केला होता. काही दिवसांनी या तरुणाच्या नातेवाईकाने तुझ्या पत्नीसारख्या दिसणाऱ्या एका मुलीचं लग्न बेटावद येथे कपिलेश्वर मंदीरात होत असल्याचं सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून सोनूला अटक केली आहे. सोनू कपिलेश्वर मंदीरात सूरत येथे राहणाऱ्या सुनील पाटील या तरुणाशी लग्न करणार होती ज्याच्याकडून तिने दोन लाख उकळले होते.

पोलिसांनी सोनू शिंदेसोबत तिचे सहकारी रविंद्र गोपाळ, योगेश साठे, पूजा साळवे यांना अटक केली आहे. पोलीस कारवाईदरम्यान सोनू शिंदेची आई वंदनाबाई, भाऊ भैरव आणि बहिण प्रिती हे गाडीतून पळून गेले. पोलीस सध्या यांचा शोध घेत आहेत. दरम्यान शाहदा पोलीस ठाण्यात सोनू शिंदे आणि तिच्या सहकाऱ्यांविरोधात ४९४, ४२०, ३४ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT