नंदुरबारचा ‘पुष्पा’ पोलिसांच्या जाळ्यात; ५० हजारांची चोरी, हेअरस्टाईलवरुन आरोपीला शोधलं
काही दिवसांपूर्वी बॉक्स ऑफिसवर आलेल्या पुष्पा या सिनेमाने सर्वांना अक्षरशः वेड लावलं आहे. पुष्णा सिनेमातील अभिनेता अल्लु अर्जुनचा डायलॉग, श्रीवल्ली गाण्यावरच्या स्टेप्सनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकुळ घातला आहे. नंदुरबारमध्ये पोलिसांनी एका चोराला त्याने केलेल्या पुष्पा हेअरस्टाईलवरुन शोधून काढलं आहे. जाणून घ्या काय आहे हे प्रकरण? नंदुरबारमधील पदम कोळी या वयोवृद्ध व्यक्तीला त्यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर एका […]
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वी बॉक्स ऑफिसवर आलेल्या पुष्पा या सिनेमाने सर्वांना अक्षरशः वेड लावलं आहे. पुष्णा सिनेमातील अभिनेता अल्लु अर्जुनचा डायलॉग, श्रीवल्ली गाण्यावरच्या स्टेप्सनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकुळ घातला आहे. नंदुरबारमध्ये पोलिसांनी एका चोराला त्याने केलेल्या पुष्पा हेअरस्टाईलवरुन शोधून काढलं आहे.
ADVERTISEMENT
जाणून घ्या काय आहे हे प्रकरण?
नंदुरबारमधील पदम कोळी या वयोवृद्ध व्यक्तीला त्यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर एका शासकीय योजनेतून ५० हजारांची रक्कम मंजुर झाली होती. ही रक्कम बँकेतून काढून येत असताना दोन तरुणांनी संधी साधत कोळी यांच्या हातातली पैशाची पिशवी लंपास केली. कोळी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर, माणूसकीच्या आधारावर पोलिसांनी आपल्या वेल्फेअर फंडातून कोळी यांना मदत केली.
हे वाचलं का?
चोरांना पकडण्याचं पोलिसांसमोर आव्हान –
पोलिसांनी पदम कोळी यांना तात्पुरती मदत केली असली तरीही आरोपींना पकडण्याचं त्यांच्यासमोर आव्हान होतं. ज्या ठिकाणी गुन्हा घडला, तिकडच्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पैसे घेऊन पळून जाणाऱ्या दोन तरुणांपैकी एकाच्या डोक्यावर पुष्पा हे नाव हेअरस्टाईलने कोरलेलं होतं. याच पुराव्याच्या आधारावर पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली.
ADVERTISEMENT
मुलाचा अभ्यास घेण्यावरून पती रागावला; पत्नीने बेडरुममध्ये घेतला गळफास
ADVERTISEMENT
हेअर कटिंग सलूनमध्ये चौकशीला सुरुवात –
पोलिसांनी तात्काळ एक टीम तयार करत शहादा तालुक्यात चौकशीला सुरुवात केली. ग्रामीण भागात पुष्पा सिनेमानंतर अनेक तरुणांनी हेअरस्टाईलमध्ये पुष्पा हे नाव कोरल्याचं पोलिसांना लक्षात आलं. त्यामुळे खरा आरोपी कोण हे शोधणं अजुनही पोलिसांसमोर आव्हान होतं. अखेरीस या शोधमोहीमेला यश आलं आणि पोलिसांना खऱ्या आरोपीचा पत्ता लागला.
ज्यानंतर पोलिसांनी छोटा धनपूर भागात जाऊन आरोपी विनोद उर्फ मिठूला अटक करुन त्याच्या जवळील ५० हजार रुपये जप्त केले आहेत. नंदूरबार पोलिसांनी केलेल्या या तपासाबद्दल जिल्ह्या स्तरावर त्यांचं कौतुक केलं जातंय.
पोलीसाच्या सतर्कतेमुळे वाचले महिलेचे प्राण, वसई रेल्वे स्थानकातला अपघात सीसीटीव्हीत कैद
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT