स्वतःचं मन शुद्ध करा, बाळासाहेबांचं स्मारक शुद्ध करणाऱ्या शिवसेनेला Narayan Rane यांनी सुनावलं
मी कुणाचं दर्शन घ्यायचं आणि कुणाचं नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं त्यानंतर शिवसैनिकांनी येऊन तिथे गोमूत्र टाकून शुद्धीकरण केलं. याबाबत नारायण राणे यांना विचारलं असता ते म्हणाले आधी शिवसैनिकांनी आणि शिवसेनेने त्यांचं मन शुद्ध करावं. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळाचा इतका अभिमान वाटत असेल तर बघा त्या बाळासाहेब […]
ADVERTISEMENT

मी कुणाचं दर्शन घ्यायचं आणि कुणाचं नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं त्यानंतर शिवसैनिकांनी येऊन तिथे गोमूत्र टाकून शुद्धीकरण केलं. याबाबत नारायण राणे यांना विचारलं असता ते म्हणाले आधी शिवसैनिकांनी आणि शिवसेनेने त्यांचं मन शुद्ध करावं. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळाचा इतका अभिमान वाटत असेल तर बघा त्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळाची गरज नाही. तिथे चिखल, दलदल झाली आहे. मी दिल्लीतही स्मारकं पाहिली आहेत अशी अवस्था एकाही स्मारकाची नसते. असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले नारायण राणे?
मी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर मी २० ठिकाणी गेलो. मी तिथे अनेक गोष्टी बोललो. मुंबईत 32 वर्षे एकाच पक्षाची सत्ता आहे त्यांनी मुंबई कशी बकाल केली हे सांगितलं. लोकांना अनेक गोष्टी सांगितल्या. मात्र मी दादर शिवाजी पार्कहून निघाल्यानंतर मला पत्रकारांनी एकच प्रश्न विचारला आहे शुद्धीकरणाबद्दल तुमचं म्हणणं काय? मला कुणाला नमस्कार करावासा वाटतो हा प्रश्न आहे.
गोमूत्र ज्यांना शिंपडायचं आहे त्यांना शिंपडू द्या. ज्यांना प्यायचं त्यांना पिऊ द्या. त्यांना प्रश्न विचारा मला काय विचारता मला काही फरक पडत नाही. बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक दलदलीत आहे. राज्याचे मुख्यमंत्री याकडे लक्ष देत नाहीत का? सुशोभीकरणाचा पत्ता नाही. बाळासाहेबांचा फोटोही सरळ दिसत नाही. जे गोमूत्र शिंपडायला आले त्यांनी जरा ती अवस्था बघा. आधी स्वतःचं मन शुद्ध करा मग कारभार करा असं म्हणत नारायण राणेंनी शिवसेनेला सुनावलं आहे.










