नारायण राणेंचा हल्लाबोल सुरुच, दिशा सालियन प्रकरणात केलं आणखी एक विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दिशा सालियन प्रकरणात केलेल्या वक्तव्यांनंतर महिला आयोगाच्या माध्यमातून दाखल झालेल्या तक्रारीमुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवसेना महापौर किशोरी पेडणेकर यांनी मध्यंतरी दिशाच्या पालकांची भेट घेत राणेंवर तोफ डागली होती. महिला आयोगाला दिलेल्या तक्रारीनंतर नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

परंतू यानंतरही राणेंचा हल्लाबोल सुरुच राहिला आहे. नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत असताना राणेंनी दिशा सालियन प्रकरणात आणखी एक विधान केलं आहे.

राणेंविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबद्दल त्यांना विचारलं असता ते म्हणाले, “ती पालकांसोबत राहत होती का? अडीच वर्ष ती पालकांसोबत राहत नव्हती. ती रॉय म्हणून एका मुलासोबत राहत होती. या मुलासोबत तिचं लग्न होणार होतं. तिचं तिच्या आई-वडीलांशी पटत नव्हतं. खरंतर आई-वडीलांनी आमची बाजू घ्यायला हवी. कारण त्यांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही धडपड करत आहोत.”

हे वाचलं का?

यावेळी नारायण राणेंनी दिशा सालियनच्या पालकांची भेट घेणाऱ्या शिवसेना नेत्यांवरही टीका केली. महापौर तिच्या आई-वडीलांना जाऊन भेटतात. म्हणजेच शिवसेना घाबरली आहे. दिशाची केस ओपन झाली की आज मंत्री असलेले नेते आतमध्ये जाणार. त्यांना वाटलं केस दाखल झाली की नारायण राणे शांत बसेल पण मी शांत बसणाऱ्यातला माणूस नाही. मी कोणतीही गोष्ट तडीस नेणारा माणूस आहे. माझ्याकडे अशी बरीचशी माहिती आहे, त्यामुळे त्यांनी शांत बसावं नाहीतर ती माहिती मी ओपन करेन, असं म्हणत राणेंनी शिवसेना नेतृत्वाला इशारा दिला आहे.

नारायण राणे यांच्या आरोपांनंतर दिशाच्या आई-वडिलांनी राज्य महिला आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार महिला आयोगाने चौकशीचे आदेश दिले होते. याबाबतचा अहवाल पोलिसांनी महिला आयोगाला दिल्यानंतर अहवालात दिशा सालियनच्या पोस्ट मॉर्ट रिपोर्टनुसार तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच ती गरोदर नव्हती असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यानंतर राणे पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT