आता ‘ईडी’समोर बोला, तोंडात बिडी देतील प्यायला; मलिकांच्या अटकेनंतर राणेंचा ‘प्रहार’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भरत केसरकर, सिंधुदुर्ग

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना आज ईडीकडून अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सूचक इशारा दिला आहे. मंत्रिमंडळात डी काय, बी काय सी काय (गँग) सगळीच माणसं आहेत. आता सगळीच जाणार,” असं राणे यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नवाब मलिकांची अटक, राज्य सरकार, शिवसेना, संजय राऊत यासह विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. मलिकांच्या अटकेबद्दल बोलताना राणे म्हणाले, “आम्ही अनेक दिवसांपासून बोलत होतो. हे होणारच होतं. संबंध आजचे नाहीत. या मंत्रिमंडळात डी काय… बी काय… सी काय सगळीच माणसं आहेत. आता क्रमाक्रमाने एक एक आत जाणार. आता भरपूर बातम्या मिळणार,” असं राणे यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यावेळी मलिकांनंतर कुणाचा नंबर आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. “तुम्हाला कळेल ना अटक झाल्यावर. आता सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या बातम्या दाखवा. नवाब मलिकांचं अनुकरण आपल्या जिल्ह्यात कुणी करू नये. काय बोलत होता. काय टीका? आता बोला ना म्हणावं ईडीसमोर. आता तोंडात बिडी देतील प्यायला”, अशी टीका राणेंनी मलिकांवर केली.

राणेंनी राज्य सरकार आणि शिवसेनेवरही सडकून टीका केली. संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली आहे. सर्व अभ्यासकांचं देखील तेच मत आहे. संजय राऊत हे शिवसेना संपविण्यासाठी हे सगळं करत आहेत. संजय राऊत सकाळी उठल्यापासून बेजबाबदारपणे बोलतात आणि त्यांच्या बेजबाबदार बोलण्यावर आम्ही काय उत्तर द्यावं. त्यांची मानसिक स्थिती चांगली नाही. हे शेवटचे वाक्य ब्रेकिंग न्यूज करा”, असं म्हणत राणेंनी राणेंवर निशाणा साधला.

ADVERTISEMENT

दिशा सालियन प्रकरणावरही राणेंनी मत मांडलं. “आम्ही काही तिची बेइज्जती केलेली नाही. तिला ज्याप्रकारे मारण्यात आलं, अत्याचार करून ते आम्हाला योग्य वाटत नाही. ज्यांनी मारलं. ज्यांनी हे केलं त्यांना शिक्षा व्हावी. ही केस दाबण्यात येऊ नये म्हणून आम्ही बोलतोय. आता तिच्या आई-वडिलांना कोण प्रवृत्त करतोय, हे देखील आम्हाला माहित आहे. दिशाच जे झालं त्यावेळी तिच्या आई-वडिलांची भूमिका काय होती हे देखील मला चांगलं माहीत आहे. याची माहिती घ्या आणि नंतर विचारा”, राणे म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT