Narayan Rane Tweet: जामीन मिळाल्यानंतर राणेंची अवघ्या दोन शब्दात प्रतिक्रिया
मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणं प्रचंड भोवलं आहे. कारण त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे त्यांच्यावर थेट अटकेची कारवाई करण्यात आली. एखाद्या केंद्रीय मंत्र्यावर पदावर असताना अशाप्रकारे अटकेची कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या कारवाईमुळे राणेंना जवळजवळ संपूर्ण दिवस पोलीस स्थानकात घालवावा लागला. ज्यानंतर रात्री उशिरा महाड कोर्टाकडून […]
ADVERTISEMENT
मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणं प्रचंड भोवलं आहे. कारण त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे त्यांच्यावर थेट अटकेची कारवाई करण्यात आली. एखाद्या केंद्रीय मंत्र्यावर पदावर असताना अशाप्रकारे अटकेची कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या कारवाईमुळे राणेंना जवळजवळ संपूर्ण दिवस पोलीस स्थानकात घालवावा लागला. ज्यानंतर रात्री उशिरा महाड कोर्टाकडून त्यांना जामीन मंजूर झाला.
ADVERTISEMENT
मात्र, जामीन मंजूर होताच नारायण राणेंनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे यांनी यावेळी फक्त दोनच शब्दात आपली प्रतिक्रिया दिली. ज्यामध्ये त्यांनी फक्त ‘सत्यमेव जयते’ एवढंच म्हटलं आहे.
— Narayan Rane (@MeNarayanRane) August 24, 2021
काल (23 ऑगस्ट) सकाळी नारायण राणे हे खूपच आक्रमक झाल्याचं दिसत होतं. सुरुवातीला त्यांनी मीडियावरच सगळ्याचा खापर फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अटकेची कारवाई झाल्यानंतर राणे हे काहीसे बॅकफूटवर गेल्याचे दिसून आले. जामीन मिळाल्यानंतर देखील ‘सत्यमेव जयते’ या अवघ्या दोनच शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हे वाचलं का?
‘करारा जवाब मिलेगा… करारा जवाब मिलेगा...‘, नितेश राणेंचं सूचक ट्विट
दुसरीकडे नारायण राणे यांचे पुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून एक सूचक इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT
नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन राजनिती या सिनेमातील एक डायलॉग पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ‘करारा जवाब मिलेगा… करारा जवाब मिलेगा..’ असा तो डायलॉग आहे. याच डायलॉगच्या माध्यमातून नितेश राणे यांनी विरोधकांवर आणि विशेषत: शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
— nitesh rane (@NiteshNRane) August 24, 2021
यामुळे आगामी काळात शिवसेना विरुद्ध राणे हा वाद अधिक रंगण्याची शक्यता आहे. काल दिवसभरात शिवसेना विरुद्ध राणे समर्थक असा वाद हा संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळाला. एवढंच नव्हे तर शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी तर थेट राणेंच्या मुंबईतील घराबाहेर जाऊन त्यांना आव्हान दिलं होतं. असं असताना आता राणेंकडून शिवसेनेवर पलटवार केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Narayan Rane: राणेंना आणखी एक धक्का, नाशिक पोलिसांनी बजावली नोटीस
जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय आहे?
नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. नारायण राणे असं म्हणाले की, ‘या मुख्यमंत्र्यांना देशाचा हिरक महोत्सव आहे की अमृत महोत्सव हेच माहिती नाही. 15 ऑगस्टला राज्यातील जनतेला उद्देशून भाषण करत असताना उद्धव ठाकरे मागे उभे असलेल्या मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना विचारतात हिरक महोत्सव आहे ना?’
‘मी त्या जागी असतो तर कानाखाली चढवली असती. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याविषयी मुख्यमंत्र्यांना माहिती नसावी हे किती चीड आणणारी गोष्ट आहे.’ असं वक्तव्य राणेंनी महाडमध्ये केले होतं.’ अशी वादग्रस्त टीका नारायण राणे यांनी केली होती.
राणेंच्या या वक्तव्यानंतर शिवसैनिकांचा अक्षरश: स्फोट झाला होता. राणेंच्या वक्तव्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी पोलिसात तक्रारी दाखल केल्या होत्या.
दुसरीकडे नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर नारायण राणेंना अटक करण्यात आली होती.
त्याआधी मुंबईसह पुणे, नाशिक आणि राज्यातील अनेक ठिकाणी राणेंविरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलनं करण्यात आलं होतं. यावेळी काही ठिकाणी राणेंची पोस्टर जाळण्यात आली होती. तर काही ठिकाणी भाजपच्या कार्यालयावर दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT